मराठवाडा

Sushma Andhare: "कळसुत्री बाहुल्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकले"; अंधारेंची फटकेबाजी

Amit Ujagare (अमित उजागरे)

बीड : शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज बीडमध्ये सुरु असून या ठिकाणी या यात्रेचा समारोप आहे. यात्रेनंतर झालेल्या सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या ४० आमदारांना त्यांनी भाऊ असं संबोधत ते भाजपच्या कळसुत्री बाहुल्यांच्या खेळात अडकले आहेत, असं त्या म्हणाल्या.

अंधारे म्हणाल्या "त्या कळसुत्री बाहुल्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकलेले आहेत. भाजपनं मेटेंचा वापर करुन घेतला मात्र त्यांच्या शिवसंग्राम सेनेच्या पदाधिकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. भाजपची ही नेहमीची नीती आहे. कारण भाजपनं रासपचे महादेव जानकर यांचाही वापर करुन घेतला त्यांचा वापर करुन टाकून दिलं. त्यानंतर त्यांनी सदाभाऊ खोत यांना पुढे आणलं आता ते कुठे आहेत? सदाभाऊ म्हणतात भाजपनं आपलं आता काय ठेवलं आहे, आता म्हशीचं दूध काढायचं आणि सोडून द्यायचं"

मला अजूनही भाजपसोबत गेलेले ते भावंड वाटतात कारण घरातील लेक म्हणून सर्वांना साभांळून घ्यावं असं वाटतं ते कितीही चुकार असले तरी. महाप्रबोधन यात्रेत आम्ही कोणावरही टीका करायला जात नाही, आम्ही फक्त त्यांना काही प्रश्न विचारतो. भाजपने जात आणि धर्माच्या दंगली सुरु केल्या आहेत. जिथं भाजप अपयशी ठरते तिथं ते महापुरुषांचा आधार घेतात सध्या ते सावरकरांच्या प्रेमात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT