Sushama Andhare
Sushama Andhare

Sushma Andhare: "वारकरी संप्रदायाचे नव्हे 'ते' तर मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी"; अंधारेंचा हल्लाबोल

बीडमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा आज समारोप होतोय यावेळी अंधारेंनी जोरदार भाषण केलं.

बीड : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्या कथीत वारकऱ्यांना निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, ते वारकरी संप्रदायाचे वारकरी नव्हतेच ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी होते. त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगू नयेत. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावरही शेलक्या शब्दांत टीका केली.

Sushama Andhare
Sushma Andhare: कळसुत्री बाहुल्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकले; सुषमा अंधारेंनी भाजपवर साधला निशाणा

अंधारे म्हणाल्या, "हिंदु-मुसलमान अशा दंगली करुन लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे. उद्धव ठाकरे सांगतात ते गोरगरीबांच्या चुली पेटवणार हिंदुत्व हवं आहे. डोळ्याला पाणी लाऊन नमं नमं करणारं हिंदुत्व नको, डोळ्यातलं पाणी पुसणार हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे.

Sushama Andhare
Mahadev Jankar: "...तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय"; जानकरांचा भाजपला थेट इशारा

तिकडं नवनीत आक्कांला नीट हनुमान चालीसा म्हणता येत नाही. तरी ते म्हणतात आम्हालाच हिंदुत्व कळतं. अरे काय हिंदुत्व तुम्हाला कळतं. काही लोकांनी माझ्यावर अॅटॅक केला आणि ते म्हणाले अरे ते तर वारकरी संप्रदायाचे आहेत. ते वारकरी संप्रदायाचे वारकरी नव्हतेच ते तर मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी होते. जे अत्यंत पेड पद्धतीनं माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला. वारकरी संप्रदायाबद्दल मी त्यांच्याकडून ऐकावं? डुप्लिकेट भाजपच्या राजकीय सेलकडून मी हे ऐकावं? वारकरी संप्रदायाचं बाळकडू घेऊन मी आले आहे.

Sushama Andhare
KarnatakaCM: शपथविधीनंतर CM सिद्धरामय्यांनी काढला पहिला आदेश; 'या' गृहिणींना मिळणार...

हिंदु हिंदु म्हणत असताना कुटुंबाला सावरुन घ्यायचं असतं. हिंदू म्हणणारे लोक कुटुंब संकटात असताना पाय लावून पळून जाणारे नसतात. जसं इकडनं ४० जण पळून गेले. हिंदुत्वाची व्याख्या ही महाराष्ट्राच्या भल्याची आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारी असते, अशा शब्दांत अंधारेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोरदार फटकेबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com