file photo
file photo 
मराठवाडा

धक्कादायक ...! उघड्या वाहनातून रक्ताची वाहतुक

सकाळ वृत्तसेवा

परभणी :  परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाने रक्तदान शिबिरासाठी जाणाऱ्या उघडे-बोडखे वाहन उपलब्ध करून दिले असून प्रचंड तापमान व वाऱ्याचा अनेकांना जीवदान देणाऱ्या रक्तावर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे शनिवारी (ता.३०) गंगाखेड येथे शिबिरासाठी जाणाऱ्या वाहनात ठेवलेले साहित्य वारंवार रस्त्यावर पडत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 
रक्तदात्यांचे रक्तदानाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवतो. परंतु दररोज विविध आजाराच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणासाठी रक्तपिशव्या देणे अनिवार्य असल्यामुळे रक्तपेढीच्या माध्यमातून संयोजकांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे घेतली जातात. शनिवारी (ता.३०) गंगाखेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या साहित्यासाठी उघडे-बोडघे वाहन दिल्या गेले. गंगाखेडला जात असतांना या वाहनात ठेवलेले साहित्य वाऱ्याचे वेगाने उडून रस्त्यावर पडत असल्याची माहिती, गंगाखेड येथे जाणाऱ्या एका ‘सकाळ’च्या वाचकाने दिली. पडलेले साहित्य पाठीमागून दुचाकीवर जाणारे रक्तपेढीचे कर्मचारी संकलीत करून सदरील वाहनचालकास थांबवून पुन्हा ठेवत होते. असे अनेक वेळा घडले. विशेष म्हणजे रक्तदान शिबिरासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वाहन नव्हते. ते दुचाकीवर शिबिरासाठी जात होते. 

बहुमोल रक्ताची हेळसांड
रक्तदान हे जीवदान म्हटले जाते. परंतु अनमोल अशा रक्ताची वाहतुक सुरक्षीतपणे केली जात नसल्याचे दिसून येते. संकलीत झालेल्या रक्तपिशव्यांसाठी आईसबॉक्स आहेत. परंतु उघड्या जीपमध्ये ठेवल्यानंतर प्रचंड तापमानाचा परिणाम त्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रचंड मेहनतीने मिळवलेले व दिलेले रक्त वापरा योग्य राहील का, याबाबत शंका आहे. वास्तविक पाहता रक्तदानशिबिरांसाठी स्वतंत्र वातानुकुलीत रुग्णवाहिकेची गरज असतांना अशी उघडी वाहने देऊन रुग्णालय प्रशासनाला काय साध्य करायचे, हे समजून येत नाही.

रक्तपेढीचे धर्मशाळेचे स्वरुप बदलेना
जिल्हा शल्य चिकीत्सकांचे रक्तपेढीकडे, येथील सुरक्षेकडे दुर्लक्ष कायम असून रक्तपेढीला आलेले धर्मशाळेचे स्वरुप मात्र कायम आहे. शुक्रवारी (ता.२९) रात्री देखील विविध विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तपेढीतच बस्तान बसवले. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीला धर्मशाळेचे स्वरुप आलेले असतांना जिल्हा शल्य चिकीत्सकांनी त्याकडे दुर्लक्ष चालवले असून त्यामुळे रस्तपेढीतील रक्तचाचण्यांना धोका निर्माण झाला आहे. रुग्णालयातील रक्तपेढीचा वापर जेवणासाठी, झोपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षासह, प्रयोगशाळा, एक्सरे विभागातील अपडाऊन करणारे, मुक्कांमी राहणारे या रक्तपेढीचाच वापर करीत आहेत. त्याच बरोबर रुग्णालयातील विविध वाहनांचे चालक देखील रात्री येथे मुक्काम ठोकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रक्तपेढीला धर्मशाळेचे स्वरुप आले असून त्यामुळे या रक्तपेढीला कोरोना संसर्गाचा धोका देखील वाढला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT