file photo 
मराठवाडा

धक्कादायक...! वेबसाईट डेटा चोरुन पैशाची मागणी 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील वेबसाईट कंपनी मालकाची वेबसाईट हॅक करून त्याला २० लाखाची मागणी केली. एवढेच नाही तर पैसे नाही दिल्यास तुझ्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात फसवणुक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक जानेवारी २०१९ ते ता. ११ जानेवारी २०१९ दरम्यान श्रीनगर येथे उघडकीस आला.
 
शहराच्या कैलासनगरच्या यश अपार्टमेंटमध्ये राहणारा सोमेश बालाजीराव झाडे (वय १९) याने स्वत: ची डोमेन वेबसाईट कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून तो आॅनलाईन मार्केटींग करत असे. या कंपनीला पुढे नेण्यासाठी त्याचा एका विश्‍वासु ग्राहकाशी संपर्क आला. त्याला त्याने आपल्या कंपनीबद्दल सांगितले. शक्यतो वेबसाईटची कंपनी अनेकांना स्थापन करता येत नाही. सोमेश झाडे याने ते करुन दाखवले. मित्राच्या माध्यमातून त्याचा नाशिक येथील योगेश भट्ट याच्याशी संपर्क आला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा ग्लेन ग्लोन्साल्वीस याच्याशी ओळख झाली. कंपनीत भागीदारी करण्यासाठी हे दोघे सोमेश याला त्रासुन सोडत. शेवटी सोमेश याने त्यांचे मित्रत्व तोडले. 

भाग्यनगर पोलिसानी मदत नाकारली

मात्र त्याच्या वेबसाईटचा या दोघांनी डाटा चोरुन स्वत: च्या फायद्यासाठी बेकायेशीररित्या आॅनलाईन वापर करत असल्याचे चौकशीत सोमेश झाडे याच्या लक्षात आले. त्या डाटाचा वापर करून सोमेशला २० लाखाची मागणी करून धमकी देत असत. पैसे नाही दिले तर तुझ्याविरोधातच पोलिसात तक्रार देतो असे म्हणून त्याला त्रासून सोडले. या प्रकरणाची तक्रार घेऊन तो भाग्यनगर पोलिस ठाण्यात गेला. मात्र तिथे त्याला पोलिसांकडून मदत मिळाली नाही. 

सायबर सेलच्या माध्यमातून तपास 

शेवटी त्याने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांची भेट घेतली. घडलेल्या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. यावेळी सायबर लॅबच्या तज्ज्ञांचा आधार घेत सर्व माहिती विचारून घेतली. सायबर सेलने त्याला चांगली मदत केली. श्री. मगर यांनी झाडे याला धीर देत भाग्यनगर पोलिसांचे कान टोचल्यानंतर अखेर या प्रकरणात योगेश भट्ट नाशिक व ग्लेन ग्लोन्साल्वीस रा. आॅस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणाचा तपास वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्याकडे देण्यात आल्याने भाग्यनगर पोलिसांच्या तपासावर पोलिस अधीक्षकांचा विश्‍वास उडाल्याचे बोलल्या जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT