aasud-yatra 
मराठवाडा

शेतात भाजपाचे झेंडे पेरावेत का? - बच्चू कडू

सिद्धांत उंबरकार

खामगाव : कर्ज माफीचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही, पीक कर्जही मिळेनासे झाले आहे. आता पेरणीचे दिवस तोंडावर येत असतानाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत. हे पैसे पेरणी पुर्वी न मिळाल्यास शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजपाचे झेंडे पेरावेत का असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला. आज ता. २५ मे रोजी खामगाव येथे आसूड यात्रे दरम्यान बोलत होते.  

शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार व बेरोगाराच्या हक्कासाठी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते भोकरदन पर्यंत आसुड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातून ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन गावापर्यंत प्रहार संघटनेच्या वतीने आसुड यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा आज २५ मे रोजी खामगाव शहरात दाखल झाली. शहरातील प्रमुख मार्गाने निघून आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार भवनामध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. 

यावेळी बोलतांना भाजप व विरोधक काँग्रेस - राष्ट्रवादीवर आ.कडू यांनी टीका केली. राष्ट्रवादी - काँग्रेस पक्ष सत्तेत असताना स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. आणि आता हल्लाबोल करुन मगर आसवे गाळत आहेत. काँग्रेसने हल्लाबोल यात्रेदम्यान शेतकऱ्यांची जाहीर माफी मागायला हवी होती. परंतु, त्यांनी तसे केले नाही. सत्तेत येण्यापुर्वी भाजपाचे नेते आमचा एक सैनिक शहीद झाल्यास त्यांचे दोन मारु अशी भाषा करीत होते. परंतु, आता आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठून पाकिस्तानची साखर भाजपाने आयात केली आहे. शेतमालाला भाव देण्याऐवजी परदेशातून शेतमाल आयात करण्याचे धोरण भाजपा सरकारचे आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरु आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना गारपीट, बोंडअळीसह इतर नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. पेरणीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास कृषीमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून आंदोलन करु असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आगामी विधानसभा निवडणूकीत ज्या ठिकाणी प्रहार संघटना मजबूत आहे अशा जागा लढवणार असल्याचे आमदार बच्चू कडू यावेळी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT