Nanded Photo 
मराठवाडा

फेरवाणी मित्रमंडळ देणार श्रुतीला दोन कृत्रिम हात

शिवचरण वावळे

नांदेड :  विजेच्या धक्क्याने दोन्ही हात गमावलेल्या व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका चिमुकलीच्या घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे समजताच प्रेमकुमार फेरवाणी मित्र मंडळाच्या सदस्यांनी श्रृतीला २१ हजाराची आर्थिक मदत केली. इतकेच नव्हे तर, भविष्यात तिला सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगता यावे, हातासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता कृत्रिम हाताच्या साह्याने जगता यावे यासाठी पुढाकार घेत मोफत कृत्रिम हात देण्यात येणार आहेत.

प्रेमकुमार फेरवाणी मित्रमंडळ मागील अनेक वर्षापासून कॅन्सरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्यात सर्वात पुढे आहे. या पूर्वी त्यांनी रक्तदान करुन शेकडोंना मदत केली आहे. शिवाय कॅन्सरग्रस्तांसाठी मदत निधी उभारण्याच्या हेतूने शहरातील अनेक नामवंत व्यापारी, दुकानदार यांच्या दुकानात मदत निधीसाठी बॉक्स बसवून त्याद्वारे शेकडो गरजवंतांस आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्यांचे सामाजिक कार्य शहरातील बहुतेक व्यापारी, दुकानदार, लहान मोठे उद्योजक इतकेच नव्हे तर शहरात मार्केटिंगसाठी येणाऱ्या अनेक व्यक्तीस माहिती असल्याने त्यांच्याकडून देखील खारीचा वाटा म्हणून मोठ्या मनाने पेटीत निधीची रक्कम जमा केली जाते. गेल्या काही दिवसात विविध दुकानातील या मदत बॉक्समध्ये जमा झालेला हा मदतनिधी श्रुतीचा उपचारासाठी देण्यात आला आहे.

कोण आहे श्रुती
गंगाधर रोडगे या खासगी वाहन चालकाची चार वर्षाची मुलगी ता. दहा जानेवारीला घराच्या छतावर खेळण्यास गेली होती. खेळत असताना विजेच्या तारेशी तिचा संपर्क आल्याने श्रुतीला विजेचा धक्का बसून तिचे दोन्ही हात गंभीररित्या भाजले. तिच्यावर मुंबई, सांगली, पुणे अशा विविध ठिकाणच्या नामांकित रुग्णालयात उपचार केले. परंतु नियतीने श्रुतीला जीवनदान देताना मात्र तिचे दोन्ही हात हिरावून घेतले. चार वर्षाच्या श्रुतीवर सध्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

न्याय व आर्थिक मदत मिळवून देणार
श्रुतीवर सुरळीत शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असले तरी, तिला महावितरणकडून अद्याप कुठल्याही स्वरुपाची आर्थिक मदत मिळालेली नाही. यासाठी देखील प्रेमकुमार फेरवाणी मंडळाचे सदस्य ‘श्रुती’च्या वडीलांशी चर्चा करुन कुठलीही फीस न घेता तिची केस लढवून तिला महावितरणकडून न्याय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यासंदर्भात विचार करत आहेत.



दोन कृत्रिम हात मिळणार
श्रुतीला दोन वेळेस करुन आम्ही २१ हजाराची मदत केली. शिवाय तिला भविष्यात कृत्रिम हाताशिवाय पर्याय नाही. यासाठी देखील मंडळाच्या वतीने पुणे येथील एका नामांकित हॉस्पीटलशी बोलणे झाले असून, सहा महिन्यापर्यंत तिच्या हातावरची सुज कमी झाल्यानंतर तिला मोफत दोन कृत्रिम हात बसवून देण्यात येणार आहेत.
- प्रेमकुमार फेरवाणी, व्यापारी, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT