aundha
aundha 
मराठवाडा

‘कोरोना’च्या धास्‍तीने नागनाथ मंदिरात शुकशुकाट

कृष्णा ऋषी

 औंढा नागनाथ (जि. हिंगोली): येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असेलेले  नागनाथाचे मंदिर सदैव भाविकांच्या गर्दीने फुलले असते. काही दिवसांपासून कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. याचा परिणाम भाविकांच्या दर्शनावर झाला असून नागनाथ मंदिरात शुकशुकाट जाणवत आहे. 

औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात नेहमी भाविकांची गर्दी कायम असते. मंदिराच्या परिसरात धार्मिक साहित्य विक्री, बेलफुल, प्रसाद आदी साहित्यांची विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना चांगला रोजगार मिळतो. मात्र, काही दिवसांपासून सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे नागरिकांतून भीती निर्माण झाली आहे. त्‍यातच भारतात देखील कोरोनाचा विषाणू आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. सोशल मीडियावर देखील अफवा पसरविल्या जात आहेत. 

विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत

यामुळे नागरिक अधिकच घाबरून गेले आहेत. प्रशासनाकडून देखील गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सूचना दिल्या जात आहेत. याचा परिणाम म्‍हणून नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम झाला आहे. नेहमी भाविकांच्या गर्दीने फुललेले असणाऱ्या मंदिरात शनिवारी मात्र शुकशुकाट जाणवत असल्याचे दिसून आले. शुकशुकाट जाणवत असल्याने अनेक व्यवसायिकांना फटका बसला आहे. बेलफुल व प्रसाद विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. 

उद्यानातही पर्यटक फिरकेनात

नागनाथ मंदिर व येथे असलेले उद्यान भाविकांचे आकर्षण आहे. अनेक जण जोडून सुट्यांमध्ये नागनाथाच्या दर्शनासाठी येतात. दुसऱ्या शनिवारी व जोडून रविवार असल्याने मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा येथील व्यवसायिक बाळगून होते. मात्र शनिवारी सकाळपासूनच भाविकांचा शुकशुकाट होता. नागनाथ उद्यानात देखील एकही पर्यटक फिरकला नाही. तसेच बोटींग चालक देखील पर्यटकांच्या प्रतीक्षेत होते. नेहमी सकाळ ते सायंकाळ अशा सुरू असणाऱ्या बोटींग देखील बंद होत्या. कोरोना विषाणूच्या भीतीने भाविकांनी दर्शनाकडे पाठ फिरविली आहे. 

मंदिर परिसरात स्वच्छता

 कोरोना विषाणूमुळे सर्वत्र दक्षता बाळगली जात आहे. प्रशासनही खबरदारीच्या उपाययोजना बाळगत आहेत. नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसराची दिवसातून तीन वेळा मंदिर परिसरात स्वच्छता केली जात आहे. आलेल्या भाविकांना स्वच्छ हात धुण्यास सांगितले जात आहे. 

मास्‍कचे वाटप केले जाते

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्‍कचे वाटप केले जात आहे. तसेच कोरोनो विषाणूमुळे सध्या काही दिवस नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी टाळलेले बरे.
-पांडुरंग माचेवाड, तहसीलदार तथा देवस्‍थानचे अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT