सिंदुरात्मक गणेश
सिंदुरात्मक गणेश  
मराठवाडा

सिंदुरात्मक गणेशाचे शेंदूरवादा गाव 

सकाळवृत्तसेवा

णेश चतुर्थी, अंगारकी-संकष्टीला गणपतीच्या देवळांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. गणेशोत्सवात तर पुण्याचा दगडूशेठ हलवाई, मुंबईचा लालबागचा राजा किंवा राजूरच्या गणपतीच्या मंदिरांमध्ये पाय ठेवायलाही गर्दी नसते; पण पुराणात सांगितलेल्या गणेशाने केलेल्या सिंदुरासुर वधाची कथा आपल्याच शहराजवळ घडल्याचे आपल्याला माहीत नसते. त्या शेंदूरवादा गावाबद्दल थोडेसे... 

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यामधील शेंदूरवादा हे खाम नदीच्या काठावर वसलेले गाव. औरंगाबाद शहरापासून जेमतेम 35 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावात खाम नदीच्या पात्रातच सिंदुरात्मक गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या स्थापत्यरचनेवरून पेशवेकाळात बांधल्याचे सांगितले जाते. कायगाव टोका येथील सुंदर मंदिरांना समकालीन असलेल्या या मंदिरात सिंदुरात्मक गणेशाची भव्य मूर्ती आहे. नदीत उतरायला छोटासा दगडी घाट आहे. जवळच दगडी बांधकामाची भाविकांना राहण्यासाठी जुन्या काळात बांधलेली सराई आहे. गणेशोत्सवात, अंगारकी-संकष्टी चतुर्थीला येथे मोठी गर्दी होते. हे मंदिर पाहण्यासाठी पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञही येथे भेट देतात. 
 
अशी आहे पौराणिक कथा 
पुराणकाळात एकदा झोपेतून उठलेल्या ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईतून महाकाय राक्षसाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने "तू ज्याला मिठी मारशील, तो भस्मसात होईल' असा वर त्याला दिला. त्याची प्रचिती पाहण्यासाठी तो ब्रह्मदेवालाच मिठी मारण्यासाठी झेपावला. त्याच्यापासून बचावासाठी ब्रह्मासह सर्वच भयभीत देवादिकांनी बाल गणेशाला साकडे घातले. गुरू पाराशर ऋषींच्या आश्रमात विद्या आत्मसात करणाऱ्या बाल गजाननाने त्या असुराला युद्धासाठी आव्हान दिले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. गजाननाने विश्वरूप धारण करून आपल्या पाशाने गळा आवळून त्या राक्षसाला ठार केले. त्याच्या रक्ताने गणेशाचे अंग शेंदरासारखे माखले. हे युद्ध जिथे झाले, ते ठिकाण म्हणजे शेंदूरवादा. येथील गणेशाला "सिंदुरवदन' किंवा "सिंदुरात्मक गणेश' असे म्हणतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT