file photo 
मराठवाडा

साहेब ! वेळेचा निर्बंध लावा परंतु लाॅकडाउन नको; व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर साकडे

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : येथील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यासाठी रविवारी (ता. ११) आलेल्या उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांना व्यापाऱ्यांनी साहेब ! वेळेचा निर्बध लावा परंतु व्यापारपेठ बंद नको असे साकडे घातले आहे.

आखाडा बाळापूर येथील पोलिस ठाण्यामध्ये रविवार (ता. ११) व्यापाऱ्यांची उपविभागीय अधिकारी  प्रशांत खेडेकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार मयूर खेगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, फौजदार अच्युत मुपडे आदी उपस्थित होते. शहरातील व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी श्री खेडेकर यांना सांगितले की वेळेचे निर्बंध लावा परंतु बाजारपेठ बंद करु नका. त्याचा खूप त्रास होत आहे. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येत आहे. तसेच व्यापारी वर्गांना नोकरांचा खर्च, बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरणा करणे अवघड झाले आहे. 

यासाठी आपण जिल्हाधिकारी यांना सांगून वेळेचे निर्बंध लावा परंतु पूर्ण बाजारपेठ बंद नको अशी मागणी केली. यावर उपविभागीय अधिकारी  प्रशांत खेडेकर यांनी आखाडा बाळापूर परिसरामध्ये मागील काही दिवसात १२० च्या जवळ कोरोनाचे रुग्ण सापडल्याने बाळापुर हे धोकादायक क्षेत्र झाले आहे. त्यानिमित्त प्रशासनाच्या वतीने बाळापुर हा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच कोरोना आजाराच्या रुग्णांची साखळी मोडायची असेल तर प्रशासनाने दिलेल्या अटीचे पालन करावं असे सांगून व्यापाऱ्यांचे म्हणणे आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगू. यावर तोडगा जिल्हाधिकारी काढतील असे सांगितले. यावेळी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विलास अमिलकंठवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील बोंढारे, संदीप नरवाडे, ग्रामसेवक रुद्राची शिरसागर व गावातील प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.

बाळापुर पोलिस ठाण्यामध्ये आयोजित उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी बोलावलेल्या बैठकीत पोलिसांच्यावतीने पत्रकारांना बोलण्यात आले नाही. यामुळे पोलिसांना पत्रकारांची ॲलर्जी झाली आहे काय असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT