file photo 
मराठवाडा

नांदेडमधील सोळा पंस सभापतींची निवड रद्द

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पहिल्या टप्प्यातील कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील सोळा पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड शनिवारी (ता. २१) होणार होती. परंतु, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून आलेल्या पत्रामुळे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सभापतींची निवड पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील सोळा पंचायत समिती सभापती व उपसभापतींचा पहिला अडीच वर्षांचा कार्यकाळ ता. २० डिसेंबर रोजी संपत असल्यामुळे प्रशासनाने नुकतीच आरक्षण सोडत काढली. यानंतर ता. २१ डिसेंबर रोजी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. या पदांसाठीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, राज्य शासनाच्या ता. दहा डिसेंबरच्या पत्रात नमूद महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २२ (ता. २३ ऑगष्ट २०१९) नुसार या आदेशान्वये चार महिन्यांचा कालावधी ता. २० डिसेंबर रोजी समाप्त होत आहे.


प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती नोटीस पाठवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समितीचे सभापती व उपसभापतींच्या निवडीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना नमूद आहेत. यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांच्या निवडीसह ता. २१ डिसेंबर रोजी होणारी पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड पुढील आदेशापर्यंत रद्द केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मंगळवारी (ता. १७) काढले आहेत.

अनेकांचा झाला हिरमोड
जिल्ह्यातील सोळा पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड पुढील आदेशापर्यंत रद्द झाल्याच्या आदेशामुळे सभापती व उपसभापतिपदांच्या दावेदारांचा हिरमोड झाला आहे. आता या दावेदारांना शासनाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांना पुन्हा एकदा जुळवाजुळव करावी लागणार आहे.

येथे क्लीक करा --श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शन

पंचायत समिती सभापतींचे आरक्षण
लोहा, नायगाव व मुखेड पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी, तर नांदेड, कंधार, भोकर, किनवट पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलांसाठी सुटले आहे. धर्माबाद व बिलोली पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, तर हिमायतनगर व माहूरचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी, हदगावला अनुसूचित जमाती महिला, देगलूरला अनुसूचित जमाती पुरुष, उमरी व अर्धापूर अनुसूचित जाती महिला आणि मुदखेड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: स्मशानभूमीतील धुरावर नियंत्रण, मुंबईतील 8 ठिकाणी 'इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर' यंत्रणा बसवणार; महापालिकेचा निर्णय

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

Marathi News Live Updates : दिल्लीत मुसळधार, द्वारका मेट्रो स्टेशन परिसरात पाणीच पाणी

Khed Shivapur Road Block: खेड-शिवापूर येथील रस्ता रोकोचा फटका; नायगावमध्ये वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा

Thergaon Dangerous Road: धोकादायक रस्त्यांमुळे जिवाशी खेळ; थेरगावातील स्थिती; उंच-सखल भागांमुळे दुचाकीस्वाराचे होताहेत अपघात

SCROLL FOR NEXT