जालना : नगरपालिका उर्दू शाळेत प्रार्थना म्हणताना विद्यार्थी. 
जालना : नगरपालिका उर्दू शाळेत प्रार्थना म्हणताना विद्यार्थी.  
मराठवाडा

उर्दू शाळेत 'खरा तो एकचि धर्म'ची साद, पहा video

सुहास सदाव्रते

जालना -  आदर्श समाजाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात खारीचा वाटा उचलत जालन्याच्या नगरपालिका उर्दू शाळेत विविध सामाजिक संस्कारक्षम उपक्रम राबविले जात आहेत. शाळेत साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ' या प्रार्थनेचा गजर घुमतो आहे, हे विशेष. 

समाजात विविध घटना घडतात, त्याचे पडसाद बालमनावरही पडतात. छोटी मुले चिकित्सक असतात, ते आपापल्या परीने घटनांचे अर्थ शोधत असतात, अन्वयार्थ काढतात. अशा बालमनांवर समाजातील थोरांचे विचार पोचणे गरजेचे असते. सामाजिक संस्कारही गरजेचे. एकता, सामाजिक एकात्मता आणि मूल्यसंस्काराचा संदेश देण्याचा प्रयत्न जालन्यातील नगरपालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत केला जातो आहे.

शहरातील मुर्गी तलाव परिसरात नगरपालिकेची उर्दू माध्यमाची शाळा आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत मुलींची संख्या अधिक आहे. शाळेच्या परिपाठात साने गुरुजींची "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' ही प्रार्थना, सोबतच उर्दू प्रार्थना "पाया ना जब सहारा, "अज्मे मोहकम अता कर खुदाया,' "लब मे आती है दुआ', "सारे जहॉं से अच्छा' आदी प्रार्थनाही परिपाठात घेतल्या जातात. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी साने गुरुजी कथामाला उपक्रम, स्काऊट-गाईड खरी कमाई अशा उपक्रमांसह विविध स्पर्धांची तयारी करून घेतली जाते. 

आमच्या शाळेतील मुली या श्रमिक व कष्टकरी पालकांच्या आहेत. उर्दू माध्यम असले तरी श्‍यामची आई या साने गुरुजींच्या संस्कार ग्रंथातील कथा जाणीवपूर्वक सांगितल्या जातात, असे शिक्षिका ज्योती आचार्य यांनी सांगितले. मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत मुख्याध्यापिका अख्तरजहॉं कुरेशी करतात. अनेक प्रकारचे चांगले कार्यक्रम शाळेत घेतले जात असल्याची प्रतिक्रिया शालेय समिती अध्यक्षा रिझवाना शेख यांनी दिली आहे. शाळेतील शिक्षिका तहेसीन बानो दुराणी, हाजी बेगम, विद्या जगनाळे, शिरीन समीना यांचाही उपक्रमात सहभाग असतो. 

मराठी पुस्तकांचे उर्दूत अनुवाद 

उर्दू माध्यमाच्या मुलांना साने गुरुजीच्या "श्‍यामची आई' या संस्कारक्षम ग्रंथातील मराठी कथांचा उर्दू भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. मुख्याध्यापिका अख्तरजहॉं कुरेशी यांनी मराठी कथांचा अनुवाद केला आहे. शामची आई ग्रंथातील थोर अश्रू, मुकी फुले या मराठी कथा अजीम आसू व आदखिले फूल उर्दू भाषेत मुलांना मुख्याध्यापिका कुरेशी सांगतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT