prem nagar 
मराठवाडा

‘या’ सोसायटीने स्वयंस्फुर्तीने ठेवला नांदेडकरांसमोर ‘आदर्श’, कसा ते वाचाच...

राजन मंगरूळकर

नांदेड ः शहरात फ्लॅटसंस्कृती आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फ्लॅटमध्ये छोट्या छोट्या जागेत जास्तीत जास्त कुटुंब वास्तव्यास असतात. सध्या ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य, जिल्हा, गाव, वस्तीतील रस्ते बंद करून ‘सोशल डिस्टंन्सिंग’चे पालन केले जात आहे. यातच शहरात पहिला ‘कोरोना’ पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जैन मंदिरजवळील प्रेमनगर सोसायटीमध्ये राहणारे सर्व फ्लॅटधारक एकत्र येत आपल्या कुटुंबासाठी स्वतःच स्वतःचे रक्षक बनले आहेत. दररोज सकाळी सहा ते रात्री दहा प्रत्येकाला स्वयंस्फुर्तीने विभागून ठराविक वेळेसाठी सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुक देण्यात आली आहे. यामुळे फ्लॅटमध्ये अत्यावश्‍यक कामासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेत त्यांना प्रेमाने बोलून गेटवरच रोखण्याची भूमिका येथील प्रत्येकजण काटेकोरपणे बजावत आहे.

हेही वाचा - Video : भरधाव वेगाने आले अन् झाले क्वारंटाइन !

अशा केल्या उपाययोजना
- बाहेरून येणाऱ्यांसाठी मुख्य गेट केले २४ तास बंद
- कोणाकडे मित्र, नातेवाईक येत असल्यास त्याची होणार रजिस्टरमध्ये नोंद
- फक्त पाण्याची बाटली, गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्यांनाच प्रवेश
- भाजीपाला, कचऱ्याची घंटागाडी यांना मुख्य प्रवेशदारावर थांबण्याचे निर्बंध
- दुधाचा वरवेवाला मुख्य गेटवरच थांबून तिथे जाऊन दूध घ्यावे
- धुणे, भांडी करणाऱ्यांना काही दिवस स्वयंस्फुर्तीने केले बंद
- मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी मोकळे मैदान, गच्चीचा वापर करावा
- मुख्य गटवर हॅन्डवॉशची, पाण्याची बादली यांची व्यवस्था.

हेही वाचा - Video-पुस्तक दिन : जाणून घ्या वाचनाचं महत्त्व

असे केले नियोजन
प्रेमनगर येथे चार विंग असून यात ९० हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत. यात दररोज सकाळी सहा ते रात्री दहा अशी रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आठवड्यातून प्रत्येकाला अंदाजे दोन तास रक्षक म्हणून नेमणूक दिली आहे. रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत असे आठ तास मुख्य गेट कुलूप बंद असेल. यासाठी प्रत्येकाने आपला होकार बैठकीत दिला असून त्याप्रमाणे नियोजन सुरू झाले आहे. तसेच मुख्य गेटवर एक सुरक्षा रक्षकही नियुक्त असून त्याचा भ्रमनध्वनी क्रमांक गेटच्या बाहेर लिहण्यात आला आहे.

इतर सोसायटींनी घ्यावा असा निर्णय...
शहरात विविध भागात अशा अनेक सोसायटी आहेत. जेथे समूहाने मोठ्या प्रमाणात कुटुंब राहतात. त्यांनी त्यांच्या घरातील सदस्यांची काळजी घेण्यास सुरवात केली आहे. तरी सर्वांनी प्रेमनगर सोसायटी सारख्या उपाययोजना राबविल्यास ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो, असा सुरही बैठकीत अनेकांनी मांडला.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT