कामखेडा (ता. रेणापूर) - गारपिटीने सोयाबीन पिकाची झालेली अवस्था.
कामखेडा (ता. रेणापूर) - गारपिटीने सोयाबीन पिकाची झालेली अवस्था. 
मराठवाडा

रेणापूर तालुक्‍यात गारपिटीने सोयबीनचे नुकसान

सकाळवृत्तसेवा

रेणापूर (जि. लातूर) - तालुक्‍यातील कामखेडा ते बिटरगाव या दोन गावांच्या परिसरात गुरुवारी (ता. 4) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास 20 मिनिटे गारपीट झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीत मिसळले असून, त्यांच्या उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फिरले आहे. यंदा तालुक्‍यात पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती.

समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या उत्पादनात मोठी घट झाली. जे थोडेफार सोयबीन झाले होते; त्याच्या ऐन काढणीच्या वेळी गुरुवारी गारांचा पाऊस झाला. या गारपिटीने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उस्मानाबाद, लातूर, बीडच्या काही भागांत पावसाची हजेरी
सारा पावसाळा खंडित स्वरूपात गेल्यामुळे दुष्काळाचे काळे ढग जमा झालेले असताना उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांच्या काही भागात गुरुवारी (ता. 4) परतीचा पाऊस झाला. सोयाबीन काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. "ऑक्‍टोबर हीट'मुळे त्रस्त झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यात दुपारी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे ऊस, तूर व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. बुधवारी (ता.3) मध्यरात्री उमरगा, तुरोरी, माकणी, बलसूर, उस्मानाबाद तालुक्‍यातील उपळा, तेर, ढोकी, जहागीरदारवाडी, कळंब तालुक्‍यातील माळकरंजा, भाटशिरपुरा, पिंपळगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. लातूर शहरात आज सकाळी पंधरा मिनिटे पाऊस झाला. रेणापूर तालुक्‍यातील कामखेडा परिसरात काहीकाळ गारपीट झाली. बीड जिल्ह्यात जूनपासून कालपर्यंत (ता. 3) पावसाच्या एकूण 124 दिवसांपैकी 94 दिवस कोरडे गेल्यानंतर आज काही भागांत परतीच्या पावसाने हजेरी लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT