file photo 
मराठवाडा

विशेष स्टोरी : श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये महाराष्ट्राच्या या संतांच्या दोह्यांचा समावेश; जाणून घ्या, त्या संतांची महती

राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील वारकरी संप्रदायाचे धर्म संस्थापक संत नामदेव महाराज यांची कीर्ती महाराष्ट्रातच नाही तर भारतात पसरली आहे. त्यांची अभंगरचना समाजासाठी त्यांनी सांगितलेला भक्तीचा मार्ग मानव कल्याणाच्या दिशेने नेणारा आहे. संत नामदेवांच्या जन्मस्थानाला व महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबध भारत देशातून विशेष करुन पंजाब प्रांतातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. 

संत नामदेव महाराज हे आद्यकीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायात ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पंजाबमध्ये जाऊन ऐतिहासिक कार्य केले. शिखधर्मीयांचा पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या दोह्यांचा समावेश आहे. त्यामुळे पंजाबमधील भाविकांनी घुमान या ठिकाणी भगत शिरोमणी नामदेव यांच्या नावाने गुरुद्वारादेखील उभारला आहे. त्यामुळे पंजाबसह देशभरातून येणारे शीख भाविक अगोदर संत नामदेव महाराज यांच्या मूळ घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतात. त्यानंतर संत नामदेव महाराज यांच्या मंदिराकडे दर्शनासाठी जातात.

संत नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा आषाढीनिमित्त पंढरपूर येथे जातो

तसेच मंदिरात जयंतीसाठी हजारो भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. होळीनंतर येणाऱ्या पापमोचनी एकादशीला येथे यात्रा भरते. ही यात्रा मिठाची यात्रा म्हणून परिचित आहे. मागच्या पंचवीस वर्षांपासून संत नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा आषाढीनिमित्त पंढरपूर येथे जातो. या पालखीचे पहिले रिंगण हिंगोलीत, दुसरे अंबेजोगाई तर तिसरे रिंगण जवळबन येथे होते.

संत नामदेव महाराज यांचे मूळ घर राष्ट्रीय स्मारक म्हणून १९९९ मध्ये घोषित
 

दरम्यान, राज्य शासनाने पर्यटकांसाठी आठ मजली राष्ट्रीय संत स्मारकाचा नियोजित आराखडा तयार केला. मात्र यासाठी अद्याप निधी मिळाला नाही. भक्तांच्या वर्गणीतून संत नामदेव मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. शासनाने संत नामदेव महाराज यांचे मूळ घर राष्ट्रीय स्मारक म्हणून १९९९ मध्ये घोषित केले आहे. आठ मजली इमारतीचे बांधकाम या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक मजल्याला संतांची नावे देण्याचेही ठरविण्यात आले. मात्र, निधी उपलब्ध झाला नसल्याने भाविकांसाठी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. कयाधु नदीच्या काठावर असलेले हे मंदिर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: नवले पुलाखाली सिमेंट टँकर उलटला, दुचाकीसह चिरडलेल्या बीडच्या तरुणाचा मृत्यू; मध्यरात्री भीषण अपघात

Bhudargad Accident : भुदरगडमध्ये अंगणवाडी सेविकेसह वृद्धाचा दुचाकी घसरून मृत्यू, नियंत्रण सुटलं अन्

Police Success Story: साताऱ्याच्या उत्कर्षा जाधवला मानाचे ‘रिव्हॉल्व्हर’; वडील निवृत्त पीएसआय, भाऊ मुंबई पोलिसात; आता कन्येनेही जिंकला मानाचा किताब..

मानसवेध : सुट्टीचं नियोजन आणि वर्षभराची ऊर्जा

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत १५ अनधिकृत शाळा; फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; पालकांना केले ‘हे’ आवाहन

SCROLL FOR NEXT