केंब्रिज चौक : या ठिकाणचे गतिरोधक खरडून टाकत पूर्णपणे हटविण्यात आले आहे.
केंब्रिज चौक : या ठिकाणचे गतिरोधक खरडून टाकत पूर्णपणे हटविण्यात आले आहे.  
मराठवाडा

व्हीआयपींसाठी गतिरोधक हटवले

संताेष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : डीएमआयसीतील ऑरिक हॉलचे शनिवारी (ता.सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी आदी व्हीआयपी जालना रस्त्यावरून जाणार आहेत, त्यामुळे गुरुवारी (ता.पाच) विमानतळ ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंतच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक काढून टाकण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने राज्यातील मंत्र्यांसह विविध विभागांचे सचिव, स्थानिक खासदार, आमदार व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी मुख्यमंत्री व इतर प्रमुख हेलिकॉप्टरने येणार असले तरी इतर सर्व व्हीआयपी मात्र विमानतळावरून थेट शेंद्य्रात दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुखकर प्रवासासाठी ठिकठिकाणी बनविण्यात आलेले मोठमोठे गतिरोधक बाधा बनू नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे गतिरोधक गुरुवारी (ता.पाच) काढण्यात आले.

वेगात धावणाऱ्या वाहनांचे अपघात घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध ठिकाणी मोठ्या चढणीचे गतिरोधक बनवून ठेवण्यात आले होते. या गतिरोधकाची उंची जास्त असल्याने कित्येकदा हे गतिरोधकच अपघाताला निमंत्रण ठरल्याचे दिसून आले आहे. यासोबतच या गतिरोधकामुळे दुचाकी चालकांसह चारचाकी वाहनांना मोठा त्रासही सहन करावा लागत होता. मात्र, जनसामान्यांना त्रासदायक ठरत असलेले गतिरोधक व्हीआयपींची फक्त एक फेरी त्रासदायक ठरू नये याची प्रशासनाने काळजी घेत गतिरोधक काढून टाकले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. वाहनधारकांतूनही याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. पुन्हा असे गतिरोधक टाकण्यात येऊ नये, अशी उपहासात्मक चर्चाही दोन दिवसांपासून करण्यात येत आहे.

या ठिकाणचे हटवले गतिरोधक
विमानतळासमोरील चिकलठाणा येथे सामान्य रुग्णालयासमोर, चिकलठाणा पोलिस ठाण्यासमोर व केंब्रिज चौक या चार ठिकाणी दुतर्फा असलेल्या गतिरोधकांसह इतर गतिरोधके काढून टाकण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT