file photo 
मराठवाडा

‘त्या’लोकांचा शोध घेण्यासाठी पथके 

कैलास चव्हाण

परभणी : घरोघरी जाऊन परदेशातून आणि पुणे, मुंबई येथून येणाऱ्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनास देण्यासाठी पथके तयार करण्याची सुचना  परभणीचे तहसिलदार विद्याचरण कडवकर यांनी तलाठी, ग्रामसेवक, सरपंचांना दिल्या आहेत.

सध्या कोरोना विषाणुळे परदेशात राहणारे, तसेच कामानिमित्त मुंबई, पुण्यात वास्तव्यास असणारी मंडळी आपआपल्या गावी परतु लागली आहे. मात्र, त्यांच्यापासून कोरोणाच्या संसर्गाची भिती असल्याने अशा लोकांची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाहेर देशातून आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांची माहिती जिल्हा प्रशासनास देण्यासाठी  तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी कार्यकर्ती, सरपंच, आरोग्य सेवक, पोलिस पाटील, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार यांनी पथकात सहभाग घेऊन  दररोज गावात फिरुन सकाळी दहा वाजता व सायंकाळी सहा वाजता प्रत्येक घरोघरी जाऊन माहिती संकलीत करावी. 


रुग्णांंना जिल्हा रुग्णालयात पाठवा
परदेशातील व्यक्ती गावात आले असतील तर  त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवण्याची व्यवस्था करावी. तसेच जी मंडळी मुंबई, पुणे किंवा इतर शहरातून आलेले आहेत त्यापैकी ज्यांना खोकला कोरड्या स्वरूपाचा असेल ताप व सर्दीची लक्षणे असतील तर त्यांना  तात्काळ रुग्णवाहीका बोलावुन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाठवावे किंवा शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवावे, अशा सुचना श्री. कडवकर यांनी दिल्या आहेत.

तरीसुध्दा ‘त्या’ लोकांना वेगळे ठेवा
बाहेरहुन आलेल्या व्यक्तींना जर कुठलीही लक्षणे आढळून येत नसतील तरीसुद्धा मुंबई-पुणे येथील आलेल्या लोकांनी स्वतःहून १४ दिवस वेगळे राहावयाचे आहे. त्यांच्या घरी किंवा शेतामध्ये आखाड्यावर, किंवा घराची व्यवस्था नसेल तर गावातील  पथकाने गावातील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत किंवा शैक्षणिक संस्था किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करावी आणि त्या ठिकाणी त्यांना भोजन व्यवस्था करावी अशा सुचना श्री. कडवकर यांनी दिल्या आहेत. आपण १४ दिवस घराच्या बाहेर पडू नये यासाठी त्यांना सांगा आणि  ऐकत नसतील तर मग मात्र  पोलिसांची मदत घ्यावी असेही श्री.कडवकर यांनी सांगीतले आहे.



प्रशासनाला सहकार्य करावे
बाहेरुन आलेल्या मंडळीनी स्वत: आणि इतरानांही सुरक्षीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. गावातील लोकांनाहीदेखील आपल्या बाहेरुन आलेल्या आप्त, नातेवाईकांची माहिती दडवुन न ठेवता प्रशासनाला द्यावी.
-विद्याचरण कडवकर, तहसिलदार, परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT