st fire accident umarga depot bus catch fire brigade police sakal
मराठवाडा

ST Fire Accident : उमरगा आगारातील मुक्कामी एसटी बसला आग

लोहारा तालुक्यातील माकणी येथील बसस्थानकात मुक्कामी असलेलली उमरगा आगाराची एसटी बसला शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आग लागली.

नीलकंठ कांबळे

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील माकणी येथील बसस्थानकात मुक्कामी असलेलली उमरगा आगाराची एसटी बसला शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आग लागली.

माकणी येथील बसस्थानकांत दररोज उमरगा आगाराच्या तीन व औसा आगाराच्या दोन अशा एकूण पाच बस मुक्कामी असतात. पण गुरुवारी रात्री औसा आगाराने माकणी येथे मुक्कामी असलेल्या दोन्ही बस परत बोलावल्या होत्या.

त्यात शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास मुक्कामी असलेल्या एसटी बसला (क्रमांक एमएच- २० बीएल १७०१) आग लावली. बसला पेटवून दिल्याचे वाहतूक नियंत्रक सुभाष आळंगे यांना समजताच त्यांनी तत्काळ बसस्थानकात येऊन वरीष्ठांना बस पेटविल्याची माहिती दिली.

त्यानंतर लोकमंगल साखर कारखाण्यातील अग्निशामक गाडी बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, एसटी बस जवळपास ७५ टक्के जळून खाक झाली. दरम्यान, रात्रीच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार , पोलिस निरीक्षक अजित चिंतले, पोकॉ विठ्ठल ढवण व एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचा पंचनामा करुन बस रात्रीच उमरगा येथे नेण्यात आली. बसचे चालक शिवाजी पांचाळ यांनी लोहारा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात विक्तीविरोधात शुक्रवारी (ता. १७) पहाटे सव्वा चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT