ST Workers Strike News esakal
मराठवाडा

हिंगोली, कळंबमध्ये एसटी कामगारांचे बेमुदत उपोषण; प्रवाशांचे हाल

हिंगोली, कळंबमध्ये एसटी कामगारांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

राजेश दारव्हेकर, दिलीप गंभीरे

हिंगोली/ कळंब : हिंगोलीत कामगार एकजुटीचा विजय असो, असे म्हणत येथील बसस्थानकासमोर विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीतर्फे एसटी कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (ता.२८) धरणे आंदोलन करत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामुळे ऐन दिवाळीत बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना ताटकळत बसवे लागले. एसटी कामगार (ST Workers Strike) संघटनेने विविध मागण्या संदर्भात हे धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात थकित महागाई भत्ता राज्य शासन प्रमाणे २८ टक्के मिळालाच पाहिजे, वाढीव घरभाडे ८ , १६ , २४ च्या दराने मिळालेच पाहिजे, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळालेच पाहिजे, दिवाळी बोनस १५ हजार रुपये मिळालेच पाहिजेत. हमारी एकता, हमारी ताकत कामगार एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय, ठरल्याप्रमाणे वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्याऐवजी तीन टक्क्यांप्रमाणे वाढवुन मिळालाच पाहिजे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळालेच पाहिजे. सण उचल १२ हजार ५०० रुपये मिळालीच (Hingoli) पाहिजे. दिवाळीपूर्वी कामगारांना आर्थिक लाभ मिळालाच पाहिजेत आदी मागण्याचा यात समावेश आहे. दरम्यान कर्मचाऱ्याच्या आंदोलनामुळे बसस्थानकावर (Diwali) प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.

एसटीच्या कामगार संघटनेच्या आंदोलनामुळे चाके थांबली

कळंब (जि.उस्मानाबाद) : एस.टी कामगार संघटना कृती समितीच्या शाखेच्या वतीने एसटीच्या कळंब आगारासमोर गुरुवारी (ता.२८) बेमुदत उपोषणला सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे एकही एसटी बस आगारातून बाहेर न पडल्याने प्रवाशांचे बेहाल झाले आहेत. ऐन दिवाळीच्या धामधुमीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाला कोंडीत पकडले असल्याने यात प्रवाशांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. कामगारांना वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के व घरभाडे भत्याचा दर अपेक्षित लागू करण्यात आलेला नसल्याचे आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उमाकांत गायकवाड, अनिल बांगर, दिलप तेलंग, बळीराम कवडे ,मनोज मुळीक, उत्तरेश्वर डीसले, गोपीनाथ कांबळे, सुबोध रणदिवे, संघरक्षित गायकवाड, महेश थोरबोले ,गणेश काळे,संध्याराणी सोनटक्के, देटे , संदीप काळे, एजास शेख, रंणजित मुंडे आदीं सहभागी असून यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

एसटीचे राज्य शासनात विलगीकरण, थकीत महागाई, वाढीव घरभाडे, ग्रेड पे, नियमित वेतन, वार्षिक वेतनवाढ या मागण्या संदर्भात एसटी कामगारांच्या संयुक्त कृती समिती २८ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करत आहे. याची महाविकास आघाडी सरकार व एसटी प्रशासनाने दखल न घेतल्यास नाराज कामगार संपावर जावू शकतो.

- उमाकांत गायकवाड, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना, कळंब आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT