भोकरदन : तालुका कृषी कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या. 
भोकरदन : तालुका कृषी कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या.  
मराठवाडा

या हो साहेब, आता वाजले की बारा !

तुषार पाटील

भोकरदन (जि.जालना)  -  शुक्रवारची (ता.29) दुपारी बारा वाजेची वेळ, नुसता सन्नाटा, रिकाम्या खुर्च्यांवर भिरभिरणारे पंखे, ट्युबलाईटचा प्रकाशझोत, अधूनमधून येरझारा घालणारे शेतकरी. हे चित्र आहे तालुका कृषी कार्यालयाचे. बैठका, दौरे, अपडाऊनच्या कारणांनी या कार्यालयाचा रामभरोसे कारभार सुरू असल्याने शेतकरीही वैतागले आहेत. 

भोकरदन शहरातील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत एकही अधिकारी, कर्मचारी हजर नव्हता. परिणामी बाहेर शेतकरी ताटकळत बसले होते. कार्यालयात सन्नाटा पसरलेला होता. रिकम्या खुर्च्यांवर पंखे भिरभिरत होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनमुळे कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे. येथे औरंगाबाद, जालना येथून अधिकारी येतात, तेव्हा कामकाज सुरू होते. विशेष म्हणजे आठवड्यातील दोन ते तीन दिवस बैठका, दौरे, मार्गदर्शन शिबिराचे निमित्त पुढे करीत कार्यालयाकडे कोणी फिरकत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांच्या दररोज चकरा 
तालुका कृषी कार्यालयात पीकविमा, शेतीच्या कामांसाठी शेतकरी दररोज चकरा मारतात; मात्र त्यांना कित्येक तास प्रतीक्षा करून आल्यापावली परतावे लागते. शासनाच्या योजनांपासूनही अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचे सांगण्यात आले. 

मी जालना येथे कामकाजानिमित्त गेलेलो होतो. त्यामुळे कार्यालयात इतर कर्मचारी होते की नाही याची मला माहिती नाही. याबाबत माहिती घेण्यात येईल. 
- ज्ञानेश्वर व्यवहारे 
तालुका कृषी अधिकारी. 

हरभरा बियाणाच्या माहितीसाठी मी सकाळपासून कार्यालयात येऊन बसलो; मात्र दुपारपर्यंत कार्यालयात कोणीही नव्हते. 
- नंदू सोनुने 
शेतकरी. 

रोटाव्हेटर सबसिडीच्या कामासाठी दोन दिवसांपासून चकरा मारत आहे. तिकडे शेतातील कामेदेखील खोळंबली आहेत. 
- मोतीराम पाबळे 
शेतकरी. 


पीकविमा भरण्याबाबतची पावती घेण्यासाठी कृषी कार्यालयात आलो. कोणीच नसल्याने खूप वेळ प्रतीक्षा केली, येथे येऊनही उपयोग झाला नाही. 
- राहुल ढवळे 
शेतकरी. 
 

  • भोकरदन : तालुका कृषी कार्यालयात दुपारपर्यंत सन्नाटा 
  • अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे अपडाऊन 
  • दुपारपर्यंत कामकाजाला होईना सुरवात 
  • शेतकऱ्यांची होईनात वेळेवर कामे 
  • मीटिंग, बैठका, दौऱ्यांचे अनुपस्थितीबाबत कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT