State Govt Diwali Ration  
मराठवाडा

Beed : शासनाचा शिधा पदरात कधी?

दिवाळी सुरू झाली तरी लाभार्थी वंचितच : अहमदपूर तालुक्यातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर : शासनाच्या वतीने शिधापत्रिका धारकांना दिवाळीनिमित्त दिला जाणारा चार जिन्नसांचा समावेश असलेला शिधासंच दिवाळी चालू झाली तरी मिळाला नसल्याने अपेक्षित लाभार्थींत नाराजी असल्याचे दिसत आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ व एक लिटर पाम तेल अशा चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेला शिधा जिन्नस संच शंभर रुपयात उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय झाला आहे.

तालुक्यात अंत्योदय अन्न योजना ४ हजार १९२ , प्राधान्य कुटुंब योजना २९ हजार ७३८ तर एपीएल शेतकरी योजना ६ हजार ५५३ असे एकूण ४० हजार ४८३ शिधापत्रिका धारक लाभार्थी आहेत.

शहरातील तेरा तर ग्रामीण मधील एकशे बावन्न अशा एकूण एकशे पासष्ट रास्त भाव दुकानदारामार्फत प्रत्येक लाभार्थ्याना हे संच दिवाळी पूर्वी मिळण्याचे अपेक्षित होते, परंतु अद्यापही पाम तेल पिशवी व या चार जिन्नस एकत्रीत देण्यासाठीच्या पिशवी रास्त भाव दुकानात उपलब्ध झाल्या नसल्याने व प्रशासनाच्या वतीने चारही जिन्नस एकत्रीत एका पिशवीतूनच द्यावे असे सुचित केल्याने एकाही लाभार्थ्याला याचा लाभ मिळाला नाही.

जिल्ह्यातील लातूर, निलंगा, उदगीर या तालुक्यातील फक्त २५ टक्के लाभार्थ्यांपर्यंत शासनाची ही योजना पोहोचल्याचे सांगितले जात आहे. अहमदपूर तालुक्यात एकाही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे लाभार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले असून लाभार्थीत नाराजी आहे.

शासनाने शंभर रुपयात रवा, साखर, चणा डाळ व तेल पिशवी देण्याचे सांगितले. दिवाळी पुर्वी या वस्तू मिळणे गरजेचे होते.अजूनही ही शिधा मिळाली नाही, दिवाळी संपल्यावर दिवाळी साजरी करावी का?

- शशीकला बोरेवार, लाभार्थी.

शासकीय योजना दिवाळी साठी होती. दिवाळीत शिधा मिळाला नाही. दुकानात चौकशी केली तर अजून शिधा उपलब्ध नाही असे सांगितले जाते. शिधा मिळणारच का नाही काही समजत नाही.

- शशीकला देवकते, लाभार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT