Latur News
Latur News 
मराठवाडा

स्पर्धा १८ प्रकारच्या अन्‌ स्पर्धक केवळ १७

सुशांत सांगवे

लातूर : युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाकडे महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनीच पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातून केवळ १७ विद्यार्थ्यांचा सहभाग या महोत्सवातील स्पर्धेत पहायला मिळाला.

विशेष म्हणजे, १८ पैकी तब्बल ११ स्पर्धेत एकाही स्पर्धकाने भाग घेतला नाही. हे चित्र पाहून आयोजकांचा आणि परिक्षकांचाही हिरमोड झाला.

लोकनृत्य असेल किंवा लोकगीतं, एकांकिका असतील किंवा शास्त्रीय गायन-वादन असेल, वक्तृत्व असेल किंवा शास्त्रीय नृत्य अशा विविध कला सादर करण्याची संधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने उदयोन्मुख कलाकारांना देण्यात आली होती. तशी जय्यत तयारीही करण्यात आली होती. पण, १८ पैकी केवळ ७ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, ही नोंदणीसुद्धा ३ स्पर्धकांच्या वर पोचली नाही. त्यामुळे स्पर्धेत उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण दिसले नाही.

युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र युवा धोरण काही वर्षांपूर्वी जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. जिल्हा स्तरावरील महोत्सव स्वामी विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालयात शनिवारी (ता. २८) घेण्यात आली.

महोत्सवातील लोकनृत्य, एकांकिका (हिंदी, इंग्रजी), सतार वादन, मृदंग वादन, बासरी वादन, वीणा वादन, ओडिसी नृत्य, कथ्थक नृत्य, शास्त्रीय नृत्य, मणिपूरी नृत्य, कुचिपुडी नृत्य या ११ स्पर्धेत शहरातील आणि जिल्ह्यातील एकाही स्पर्धकाने भाग घेतला नाही. तर शास्त्रीय गायन स्पर्धेत २, तबला वादन स्पर्धेत ३, गिटार वादन स्पर्धेत २, लोकगीत स्पर्धेत २, वक्तृत्व स्पर्धेत ३, हार्मोनियम वादन स्पर्धेत ३, भरतनाट्यम स्पर्धेत २ स्पर्धक सहभागी झाले होते.

आज रंगणार विभागीय स्पर्धा

दरम्यान, यंदा प्रथमच राज्यस्तरीय युवा महोत्सव लातूरात होणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. राज्यस्तरीय महोत्सवात तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश असेल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले. जिल्हास्तरीय स्पर्धेनंतर लगेचच उद्या (ता. २९) विभागीय स्पर्धा घेतली जाणार आहे. यात लातूरसह नांदेड, उस्मानाबादमधील स्पर्धक सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेनंतर 4 ते 6 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय युवा महोत्सव होणार आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. याप्रसंगी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, परीक्षक सोनू डगवाले, शिवकुमार उरगुंडे, संजय सुवर्णकार, शंकर जगताप, संतोष गालफाडे, शरद खंदाडे, शिवगंगा जगताप उपस्थित होत्या.

सरकारच्या वतीने घेण्यात येणारा युवा महोत्सव हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पण, या महोत्सवाच्या माध्यमातून होणारी कला स्पर्धा ही क्रीडा विभागाच्या वतीने घेतली जाते. त्यामुळे सरकारने सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, संस्थांची मदत घेतली किंवा त्यांची संयोजन समितीने नेमली तर नक्कीच या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढलेला दिसेल.
- सोनू डगवाले, परीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT