hingoli 
मराठवाडा

हिंगोलीत दगडफेकीने तणाव; वाहनांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली शहरांमध्ये सोमवारी (ता. १२) दगडफेकीच्या घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले असून सुमारे 50 पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिस प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

हिंगोली शहरांमध्ये नांदेड नाका भागामध्ये आज नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने अवघ्या काही वेळातच बाजारपेठ बंद झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवरही दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. नांदेड औंढा मार्गावरील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याने सुमारे 50 पेक्षा अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कार व इतर वाहनांमधून विटकरींचा  खच पडला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपअधीक्षक सुधाकर रेड्डी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनातर्फे शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road BMW Accident : फ्लायओव्हरवरून थेट खाली कोसळली कार, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा जागीच मृत्यू; काय घडलं?

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : शिरूर गोळीबाराची घटना ताजी असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT