औरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचे खांब असे केबलने वेढले आहेत.
औरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचे खांब असे केबलने वेढले आहेत. 
मराठवाडा

केबल हटविण्याचा देखावा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांवरून टाकण्यात आलेले धोकादायक केबल काढण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आठ दिवस मोहीम राबविण्यात आली. मात्र, अद्याप अनेक रस्त्यांवर धोकादायक केबल कायम असून, मोहीम अर्धवट थांबविण्यात आल्याने नागरिकांच्या जिवाला धोका कायम आहे.

पथदिव्यांसाठी महापालिकेने शहरात सुमारे ४० हजार खांब उभारले आहेत. या खांबांचा वापर सध्या इंटरनेट, टीव्हीचे केबल टाकण्यासाठी केला जात आहे. अनेकवेळा हे केबल रस्त्यावर लोंबकळून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पथदिव्यांवर असलेले केबल काढण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार नऊ प्रभागांसाठी नऊ पथके तयार करून महापालिकेने मोठा गाजावाजा करीत कारवाई सुरू केली. मात्र, नेहमीप्रमाणे ही मोहीमदेखील अर्धवट राहिली आहे. सेंट्रल नाका रस्त्यावर केबल काढताना योग्य खबरदारी घेतली नसल्यामुळे एका चिमुकलीला गळफास बसल्याची घटना घडली होती. चिमुकलीच्या उपचारासाठी आलेला खर्च महापालिकेला करावा लागला. त्यानंतर ही मोहीम रखडली आहे. अतिक्रमण हटाव विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मोहीम थांबली असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप शहरातील अनेक रस्त्यांच्या पथदिव्यांवर केबलचे जाळे कायम आहे.

शंभर किलोमीटर केबल केली जप्त 
शहरातील मुख्य रस्त्यावर म्हणजेच जालना रोडवर मोठ्या प्रमाणात केबल होती. त्यानुसार केबल कट करून ती जप्त करण्यात आली. जालना रोडसह इतर रस्त्यांवर आतापर्यंत शंभर किलोमीटर केबल जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT