बदनापूर : येथील ज्ञानगंगा विद्यामंदिर शाळेत प्लॅस्टिकमुक्त अभियानाअंतर्गत बदनापूर नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेला जनजागृती कार्यक्रम.
बदनापूर : येथील ज्ञानगंगा विद्यामंदिर शाळेत प्लॅस्टिकमुक्त अभियानाअंतर्गत बदनापूर नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेला जनजागृती कार्यक्रम.  
मराठवाडा

महिनाभराचे प्लॅस्टिक घेऊन विद्यार्थी शाळेत 

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) - नगरपंचायत प्रशासनातर्फे प्लॅस्टिकमुक्‍तीसाठी "घरात साठवा, शाळेत पाठवा' उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राबविणे सुरू केले आहे. यात नगरपंचायतीने सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना घरात जमा झालेल्या प्लॅस्टिक पिशव्या महिन्याच्या शेवटी शाळेत आणून देण्याचे आवाहन केले. याबदल्यात विद्यार्थ्यांना नगरपंचायतीच्या वतीने बक्षीस स्वरूपात शालेय साहित्याचे वाटपही करण्यात येत आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू झाला. यात बदनापूर नगरपंचायत प्रशासनाने शहरातील सर्व शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांची एक बैठक घेऊन त्यात ही संकल्पना मांडली. या उपक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की, विद्यार्थी व त्यांचे पालक घरात वापरत असलेले प्लॅस्टिक महिनाभर आपल्या घरात एका पिशवीत साठवून ठेवायचे. आणि महिन्याच्या शेवटी गोळा झालेले प्लॅस्टिक शाळेत जमा करायचे. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन शाळेत जमा झालेले प्लॅस्टिक गोळा करील. हा उपक्रम सोपा मात्र प्रभावी असल्यामुळे शहरातील सर्वच शाळांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

एका महिन्यानंतर या उपक्रमाचे फलित समोर येण्यास सुरवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवलेले प्लॅस्टिक शाळेत जमा केले आणि याबदल्यात विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी वही, पेन, पुस्तके, रंगपेटी, कंपास अशा शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येते. त्यातही जो विद्यार्थी सगळ्यात जास्त प्लॅस्टिक गोळा करून शाळेत घेऊन येतो त्या विद्यार्थ्याचा नगरपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येतो. 

विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केलेले प्लॅस्टिक संकलन नगरपंचायत एका वाहनाद्वारे करते. साधारणतः एका शाळेत महिन्याच्या शेवटी 80 ते शंभर किलो प्लॅस्टिक जमा होत आहे. नगरपंचायत जमा केलेले प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी पाठवत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी बदनापूर नगर पंचायत नगराध्यक्ष प्रदीप साबळे, उपनगराध्यक्ष शेख युनूस, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्यासह सर्वच सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. 

बदनापूर शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियानाला नागरिकांकडून प्रतिसाद लाभत आहे. शालेय विद्यार्थ्यांमार्फत "घरात साठवा, शाळेत पाठवा' उपक्रम यशस्वी ठरत आहे. विभागीय आयुक्त यांच्या निर्देशावरून प्लॅस्टिकमुक्ती मोहिमेला आणखी गती देण्यात आली आहे. हा उपक्रम राबविणाऱ्या विद्यार्थी व शाळांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
- डॉ. पल्लवी अंभोरे ,
मुख्याधिकारी, नगरपंचायत, बदनापूर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT