पाथ्री (ता.फुलंब्री) ः विद्यार्थ्यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
पाथ्री (ता.फुलंब्री) ः विद्यार्थ्यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.  
मराठवाडा

पाथ्री येथे विद्यार्थ्यांनी केला रस्ता रोको आंदोलन

नवनाथ इधाटे

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील पाथ्री येथे शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी व शिक्षक येथे ये-जा करीत असतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाची बस येथील थांब्यावर थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन मंगळवारी (ता.17) केले. सिल्लोड आगार प्रमुखांनी लेखी निवेदन दिल्यानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे.


फुलंब्री तालुक्‍यातील पाथ्री हे गाव औरंगाबाद- जळगाव महामार्गावर वसलेले आहे. येथे नियमित हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.येथे माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, डीएड कॉलेज, औषध निर्माण महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, वारकरी शिक्षण संप्रदाय शिक्षण संस्था आदी विविध प्रकारचे तांत्रिक अभ्यासक्रम शिकवले जात असल्याने दररोज हजारो विद्यार्थी येथे ये - जा करीत असतात. त्यामुळे येथे बस थांबणे अत्यंत गरजेची आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडचे योगेश पाथ्रीकर व तत्कालीन सरपंच वरुण पाथ्रीकर यांनीही वेळोवेळी परिवहन महामंडळाला निवेदने देऊन रस्ता रोको आंदोलने केलेली आहे. मात्र आठ दिवस सुरळीत बस सुरु असती.

मात्र त्यानंतर पुन्हा बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती. मागील आठड्यात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी परिवहन महामंडळाला निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीही बस थांबत नसल्याने शेवटी मंगळवारी प्रहार संघटनेने रास्तारोको आंदोलन केले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम गायकवाड, युवा तालुकाध्यक्ष राम गाडेकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर, शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर गाडेकर, प्रहारचे कार्याध्यक्ष मधुकर काकडे, उपाध्यक्ष दिलीप शिंदे, आदींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेच्या भीतीने काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणं टाळलं - अमित शाह

SCROLL FOR NEXT