SugarCane Cutters News, Latur 
मराठवाडा

लातूरच्या ऊसतोड मजूरांवर तामिळनाडूमध्ये उपासमारीची वेळ, शासनाकडून मदतीची अपेक्षा

हरी तुगावकर

लातूर ः  हातावरच पोट घेऊन ठिकठिकाणी फिरणाऱ्या ऊसतोड मजुरावर आज वाईट वेळ आली आहे. त्यात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) लातूर जिल्हा परिसरातील ७० मजूर तामिळनाडूमध्ये अडकले आहेत. साखर कारखाना बंद झाल्याने या मजुरांना तेथील कारखाना व्यवस्थापनाने वाऱ्यावर सोडले आहे. तुम्ही तुमची व्यवस्था करा असे त्यांना सांगण्यात येत आहे. लहान मुलांसह असलेल्या या ऊसतोड मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना सोडा तुम्ही दुसऱ्या कारखान्यात जावा अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. गावाकडे यायचे पण येता येत नाही. तेथे व्यवस्था नाही अशा कात्रीत हे मजूर सापडले आहेत. याकडे आता राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.


लातूर परिसरातील कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर अनेक ऊसतोड मजूर परराज्यात कामासाठी जात आहेत. कर्नाटक, तामिळनाडू भागातील कारखान्याचे अधिकारी येऊन अशा ऊसतोड मजूरांना ऊसतोडीसाठी घेऊन जात आहेत. या वर्षी येथील हंगाम संपल्यानंतर परराज्यातील कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी येथील ऊसतोड मजूरांना पहिल्यांदा कर्नाटकात नेले. त्यानंतर महिना दीड महिन्यापूवी त्यांना तामिळनाडूमध्ये ऊसतोडीसाठी नेण्यात आले. यात मुरुड, तांदूळजा (ता.लातूर), अंबाजोगाई, बनसारोळा, परळी आदी भागातील सुमारे ७० मजूर आपल्या कुटुंबासह ऊस तोडीसाठी गेले होते. या कुटुंबांसोबत पंधरा लहान मुलेही आहेत.

तामिळनाडूमधील अप्पाकोडल (जि.येरोड) येथील शक्ती शुगर्स कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काही दिवस त्यांनी कामही केले. गेल्या तीन वर्षांपासून हे मजूर त्या भागात जात आहेत. त्यामुळे या वर्षीही ते तिकडे गेले होते. पण कोरोनाच्या विषाणुमुळे देश संकटात आहे. देशभरात टाळेबंदी करण्यात आली आहे. याचा फटका या मजूरांना बसला आहे. कारखाना बंद झाला आहे. त्यामुळे ऊसतोडही बंद झाली आहे. गेली काही दिवस या मजूरांना याच कारखान्याच्या दुसऱ्या बंद पडलेल्या युनिटच्या परिसरात राहण्यास सांगण्यात आले. अशा वेळी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून या मजूरांच्या खाण्याची सोय करण्याची आवश्यकता होती. पण तुम्ही तुमची व्यवस्था करा असे या मजूरांना सांगण्यात आले. त्यामुळे हे सर्व मजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. हळूहळू जवळचा पैसा संपत चालला आहे. त्यात कामही नाही. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.


तामिळनाडूतील शक्ती शुगर्स कारखान्यासाठी आम्ही गेल्या एक दीड महिन्यांपासून ऊस तोडणीचे काम करीत होतो. टाळेबंदीमुळे कारखाना बंद झाला आहे. आम्ही ७० जण आहोत. काही लहान मुलेही आहेत.कारखाना व्यवस्थापनाने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. रविवारी (ता.२९) सायंकाळी जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला गावाकडे येता येत नाही अन् येथे राहता येईना अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र शासनाने आम्हाला मदत करावी.
- गणेश धाकपडे, ऊस तोड मजूर, तांदूळजा (ता. लातूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: महिलेकडून अत्याचाराचे आरोप; विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण

Gokul Election : 'संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ असेल', खासदार महाडिकांचे मंत्री मुश्रीफांना प्रत्युत्तर; महाडिक-नरके एकाच गाडीतून आल्याने चर्चांना उधाण

Shocking News : धक्कादायक घटना ! युट्यूब पाहून नातेवाईंकानी घरीच केली प्रसूती, महिलेचा दुर्देवी मृत्यू

धक्कादायक! आचाऱ्याला मारहाण अन् शिविगाळ; प्रीती झिंटाच्या 'आवडत्या' खेळाडूविरोधात FIR, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: बसस्थानकातून प्रवाशांची पळवापळवी सुरूच; ‘भाडे कमीची हमी’चे दाखवले जाते प्रवाशांना आमिष

SCROLL FOR NEXT