Bird
Bird 
मराठवाडा

सुखना जलाशयावर पक्ष्यांचा मेळा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - थंडीची चाहूल लागताच जायकवाडी, सुखना जलाशयावर परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होते. हजारो मैलांचा प्रवास करीत हे पक्षी जलाशयावर येतात. यंदाच्या दिवाळीत सुखना जलाशयावर फ्लेमिंगो, चक्रवाक, बार हेडेड, ब्लॅक स्टोर्कसह असंख्य पक्ष्यांचा सुखना जलाशयावर मेळा भरला आहे.  

निसर्ग मित्रमंडळ व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनांतर्फे राज्यभरात पक्षी उत्सव घेण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानिक तसेच प्रवासी पक्ष्यांच्या नोंदीसाठी सुखना जलाशयावर निरीक्षण करण्यात आले. यात पक्षीमित्र किशोर गठडी, केदार चौधरी, नागेश देशपांडे, मोहन शिखरे यांच्यासह पक्षीप्रेमींनी सहभाग नोंदविला. शहरापासून अवघ्या २२ किलोमीटरवर असलेल्या या जलाशयावर शहर आणि परिसरातील पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी हजेरी लावत असतात. दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर परदेशी पक्षी या जलाशयावर येतात. यंदा पक्षी लवकर आल्याचे या निरीक्षणात दिसून आले, तर काही पक्षी प्रथमच काही वर्षांच्या अंतराने आल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.

या पक्ष्यांच्या झाल्या नोंदी 
रोहित (अग्निपंख), चक्रवाक, चमचा (दर्विमुख), काळा करकोचा, पट्टकादंब (पट्टेरी राजहंस), राखी बदक, तलवार बदक, वेडा राघू, कुरव पक्षी, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, खंड्या, काष्ठ खाटीक, कोतवाल, नदीसुरय, राखी बगळा, कापशी घार, गप्पीदास, ठिपक्‍यांचा होला, शेकाट्या, पिवळा धोबी, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, मोठा वटवट्या या पक्ष्यांच्या नोंदी पक्षी निरीक्षणात करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र किशोर गठडी यांनी दिली.

पक्षी दोन प्रकारचे
भारतात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांमध्ये ‘वेडर्स’ आणि ‘हॅसिवर्स’ या कुळातील पक्ष्यांचा समावेश आहे. वेडर्स जलकीटक खातात; तर वेडर्सला खाऊन हॅसिवर्स जगतात. सुरवातीला वेडर्स येतात. त्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्यापाठोपाठ हॅसिवर्स येतात.  

रात्रीच करतात प्रवास
हे परदेशी पक्षी भारतात येण्यासाठी रात्रीच प्रवास करतात; कारण रात्री तापमान कमी असते. शिवाय त्यांची शिकार करणाऱ्या भारतीय पक्ष्यांना रात्री दिसत नाही. तसेच रात्री लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमुळे या पक्ष्यांना प्रवासाची दिशाही ठरवता येते.

का येतात भारतात?
हिवाळ्यात सायबेरियामध्ये कडाक्‍याची थंडी पडते. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीही होते. त्यामुळे या पक्ष्यांना तिथे अन्न मिळत नाही. अन्नासाठी ते भारतात येतात; मात्र या प्रवासात त्यांना हिमालय अडथळा ठरतो. इतक्‍या उंचावरून त्यांना उडता येत नाही. त्यामुळे ते अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे खैबरखिंडीला वळसा घालून येतात. काही पक्षी नेपाळ, भूतानमार्गेही येतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT