अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह  
मराठवाडा

असे आहे साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : उस्मानाबाद हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. सर्वांच्या सक्रिय सहभागातून येथे होणारे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी दिली. 
येथे 10,11,12 जानेवारी 2020 ला हे संमेलन होत असून तयारी सुरु आहे. संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरुवारी झाले. त्यावेळी मुधोळ-मुंढे बोलत होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले उपस्थित होते.


उस्मानाबादमध्ये होणारे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्याची संधी साहित्यिक, साहित्यप्रेमींना मिळणार आहे. त्यासाठी संयोजन समितीने आवश्‍यक ते नियोजन करावे. आवश्‍यक तेथे प्रशासनाचे सक्रिय योगदान मिळेल, असे मुधोळ-मुंढे म्हणाल्या.

ऐतिहासिक संदेश दिला गेल्याने संमेलनाचे बोधचिन्ह संस्मरणीय ठरणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सर्वांसमोर येईल, असेही रोशन म्हणाले. 
स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी संमेलन आयोजनाबाबत माहिती दिली. प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर यांनी केले. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. अनार साळुंखे यांनी आभार मानले. 
 
विजयकुमार यादव यांचा सन्मान 
संतश्रेष्ठ गोराकुंभार यांच्या पावन भूमीत संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर संत गोराकुंभार यांच्या हाती चिपळ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली प्रतिमा बोधचिन्हात साकारली आहे. "म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा' ही संत गोराकुंभाररचित अभंगातील पंक्ती बोधचिन्हावर आहे. येथील विजयकुमार यादव यांनी साकारलेले हे बोधचिन्ह आयोजक समितीने निवडले आहे. मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Discount News: Maruti, Hyundai आणि Tata च्या गाड्या झाल्या स्वस्त! 2.15 लाखांपर्यंतची बंपर सूट; कोणत्या मॉडेलवर किती फायदा?

"आमटी भात खाऊन दिवस काढू पण छान काम कर" अंशुमनने उघड केलं हास्यजत्रा सोडण्याचं खरं कारण

Mumbai: मुंबईतील विहार तलावाला पौर्तुगीजकालीन इतिहास, पावणेचारशे वर्षांपूर्वीचे अवशेष अजूनही जिवंत

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लागलेल्या आगीमध्ये लाडकी बहीण योजनेचे दस्ताऐवज जळून खाक

IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा विजय; पदार्पणवीर मानव सुतारसह वॉशिंग्टन सुंदर चमकले

SCROLL FOR NEXT