file photo 
मराठवाडा

भयंकर! तो शिक्षक मुलींना दाखवायचा...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहराच्या माळटेकडी परिसरात असलेल्या एका खासगी शाळेत चौथीतील मुलीचा त्याच शाळेतील एका शिक्षकाने मोबाईलवर अश्‍लिल चित्र दाखवून विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला शुक्रवार (ता. सात) फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

शहराच्या माळटेकडी परिसरात प्रबोधन प्राथमीक ही चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या तीसरी व चौथीतील मुलींना वरच्या खोलीत नेऊन विकृत असलेला शिक्षक स्वप्नील शृंगारे हा मागील पाच ते सहा महिण्यापासून विनयभंग करत असे. एवढेच नाही तर तो मुलींना आपल्या मोबाईलमधील अश्‍लिल फोटो दाखवून तो अश्‍लिल चाळे करत असे. 

नराधम शिक्षक दाखवित होता अश्‍लिल व्हिडीओ

हा प्रकार जर तुम्ही घरी सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकतो तसेच शाळेवरून फेकून देऊन ठार मारून टाकतो अशी धमकी देत असे. एवढेच नाही तर हा प्रकार त्याचा मागील सहा महिण्यापासून सुरूच होता. घडलेला प्रकार मुलींनी आपल्या घरी आईला सांगितल्याने समोर आला.

या नराधम शिक्षकाने एक नव्हे तर अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर सोमवारी पालकांनी मुख्याध्यापक गंगाधर वन्ने यांना घेरले. जोपर्यंत तुम्ही स्वपनील श्रृंगारेला बोलावणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. यानंतर मुख्याध्यापकांनी त्याला बोलावून घेतले. तो शाळेत येताच पालकांनी त्याला चांगलाच चोप दिला. 

न्यायालयाने पाठविले पोलिस कोठडीत

पोलिस निरिक्षक संजय ननवरे यांनी स्वप्नील श्रंगारेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हजर केले. रात्री उशिरा त्याची सविस्तर विचारपूस करून अटक केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी पिडीतांची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली.

पिडीत बालिकेच्या पालकानी दिलेल्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंग, बाललैंगीक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला फौजदार श्रीमती पवार यांनी मंगळवारी नराधम शिक्षक श्रृंगारे याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. 

नराधम शिक्षकाचे दोन लग्न

शहराच्या सांगवी परिसरात राहणारा स्वप्नील श्रृंगारे (वय ३२) याचे दोन लग्न झालेले आहेत. त्याचे वडील याच शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असतांना निधन झाले होते. त्यांच्या रिक्त जागी अनुकंपा तत्वावर त्याला या शाळेवर घेण्यात आले होते.

तो मागील चार वर्षापासून तेथे शिक्षक म्हणून काम करत होता. परंतु त्याने केलेल्या या घृणास्पद कामामुळे शिक्षक व विद्यार्थी या पवित्र नात्याला काळिमा फासल्या गेली. त्याची आईसुद्ध शिक्षिका असून तो मागील काही दिवसापासून नशेच्या आहारी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.    


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT