Nanded News
Nanded News 
मराठवाडा

दहावितल्या मुलाची ‘ही’ कादंबरी प्रेरणादायी

प्रमोद चौधरी

नांदेड : हल्लीची मुलं पुस्तकं वाचत नाहीत, ही निव्वळ अफवा आहे. आपण मोठी माणसं त्यांना आवडणारी पुस्तकं उपलब्ध करून देत नाही, हीच खरी अडचण आहे. नीतिमान माणूस घडविणे हे कोणत्याही बालसाहित्याचे प्रमुख उद्दिष्ट असते. नीतिमान समाज निर्माण व्हावा, अशी आपली अपेक्षा असेल, तर बालकुमारांना शालेय स्तरावर चांगले बालसाहित्य उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.     
 
इयत्ता दहावीत शिकणाऱ्या नचिकेत केशव मेकाले या विद्यार्थ्याने लिहिलेल्या ‘नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे जग’ या किशोर कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (ता. २३ नोव्हेंबर) झाले. सांगलीचे उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, बालसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, आयआयबीचे संचालक दशरथ पाटील, भार्गव अकादमीचे संचालक भार्गव राजे, शिक्षणविस्तार अधिकारी केशव मेकाले, बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत आदी यावेळी उपस्थित होते.  

विद्यार्थ्यांचे साहित्य असते कसदार
‘मुलं म्हणजे मातीचे गोळे’ अशी संकल्पना समाजामध्ये रुढ झालेली आहे. परंतु, नचिकेतने कादंबरीच्या माध्यमातून ही संकल्पना खोटी ठरवली आहे. वास्तविक पाहता आजची पिढी खूप  कुतुहलाने जगाकडे पाहाते आणि विचारही करते. त्यांची वाचनाची भूक खूप दांडगी आहे. तयासाठी आपल्याला देवालय आणि शिवालयाप्रमाणेच वाचनालयेसुद्धा प्रिय असली पाहिजेत. नचिकेत मेकालेसारख्या विद्यार्थ्याने ही १२३ पृष्ठांची किशोर कादंबरी लिहिली हा मराठी बालकुमार साहित्यातील मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही. मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेल्या बालसाहित्यापेक्षा विद्यार्थ्यांनी लिहिलेले बालसाहित्य हे अधिक कसदार असते, हेही नचिकेतना दाखवून दिले आहे.

चमत्काराला तंत्रज्ञानाची जोड
विशेष म्हणजे नचिकेतसारखी किशोर कादंबरी मोठे लेखकसुद्धा लिहू शकणार नाहीत, एवढी अप्रतिम झाली आहे. प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं. नचिकेतचं हे लेखन वाचून हा ज्ञानेश्वरांच्या कुळातला व्यासंगी लेखक निश्‍चितच वाटतो. नचिकेतच्या लेखनात अद्‌भुतरम्यता आहे. गूढ गोष्टी आहेत, रहस्य आहे, फॅन्टसी आहे, तसेच त्याने चमत्काराला तंत्रज्ञानाची जोडही दिलेली आहे.  

वाचनाचा छंद जोपासावा
नचिकेतच्या बुद्धिमत्ता ही एखाद्या मुरब्बी लेखकासारखी आहे. नचिकेतचे भविष्य उज्ज्वल असून, ही कादंबरी लिहून नचिकेतने शालेय विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून वाचनाचा छंद जोपाल्यास तो किती महत्त्वाचा आहे हे या कादंबरीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले आहे.   
- डॉ. सुरेश सावंत (ज्येष्ठ बालसाहित्यिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT