Latur Corona Updates, Latur
Latur Corona Updates, Latur 
मराठवाडा

ठाणे महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा लातूरकरांना नडला, काय घडले वाचा ?

हरि तुगावकर

लातूर : राज्यातील ग्रीन झोन असलेल्या एकमेव लातूर महानगरपालिका क्षेत्रात रविवारी (ता.१७) कोरोनाचा शिरकाव झाला. शहरातील रहिवाशी असलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सलग तीन टाळेबंदीमध्ये शुन्यावर असलेले लातूर हदरले. यात ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा लातूरकरांना नडला असून हा व्यक्ती गंभीर असताना व तो महापालिकेच्या रुग्णालयात एक दिवस दाखल असतानाही त्याची तेथे कोरोना तपासणी केली नसल्याचे उघड झाले आहे. तपासणी न करताच त्याला लातूरला पाठवून दिले असून सध्या हा रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहे. ठाणे महापालिकेच्या रुग्णालयाने कोरोनाची तपासणी न करताच असे रुग्ण पाठवून दिल्याची गंभीर बाब यानिमित्ताने समोर आली असून रूग्णालय प्रशासनाविरूद्ध लातूरकरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.


ठाण्याहून रुग्णवाहिका करून लातूरचा एक रहिवाशी असलेला रुग्ण रविवारी (ता.१७) येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल झाला. ठाण्यावरून आल्याने येथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यापूर्वी पहिल्यांदा त्याची कोरोनाच्या संदर्भात स्वॅबची तपासणी केली. येथील प्रयोग शाळेत त्याच्या स्वॅबचा नमुना तपासण्यात आल्यानंतर तो पॉझिटीव्ह आला. त्यानंतर लगेच येथील डॉक्टरांनी त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरु केले आहेत. खरे तर हा रुग्ण दोन दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या एका रुग्णालयात भरती झाला होता. तेथेही त्याची प्रकृती गंभीरच होती. पण तेथील डॉक्टरांनी कोरोनाच्या संदर्भात कोणतीही तपासणी केली नाही. ते करणे गरजेचे होते. तसे झाले असते तर या रुग्णावर तेथेच उपचार केले जाऊ शकले असते. पण तसे न करता रुग्णाने विनंती केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. तो तेथून रुग्णवाहिका घेवून येथे आला. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल झाला. त्याची तपासणी केल्यानंतर तो पॉझिटीव्ह आला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर येथील डॉक्टर उपचार करीत आहेत.


ठाणे येथील महापालिकेच्या रुग्णालयात हा रुग्ण भरती झाला होता. पण तेथे त्याची कोरोनाची तपासणी झाली नाही. त्याच्या डिस्चार्ज कार्डवरही कोणत्याही प्रकारची नोंद केलेली नाही. तो ठाण्याहून आल्याने आम्ही त्याची कोरोना संबंधीत तपासणी केली. त्यात तो पॉझिटीव्ह आला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नी, मुलगी व भावाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
डॉ. मारुती कराळे, प्रमुख, विलगीकरण कक्ष, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT