file photo  
मराठवाडा

विकास कामाच्या श्रेयवादाचा कलगीतुरा  

नवनाथ येवले

नांदेड : ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीत इमरातीच्या कामावरुन माहूर तालुक्यात आमदार भिमराव केराम आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ९७ लाख ३६ हजार रुपयांचा निधी माहूर येथील ग्रामीण रुग्णालय इमरातीच्या विस्तारीत कामास मंजूर झाला आहे. माजी आमदार प्रदिप नाईक यांनी मागील सहामहिन्यापूर्वी विस्तारीत इमरतीच्या कामास मान्यता मिळवून दिली. जिल्हा अधिकारी अरुण डोंगरे, मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जागेचा तिढा सोडविल्याने जिल्हा वार्षीक योजनेतून निधी मंजुर झाला आहे. त्यामुळे आमदार श्री. केराम यांच्याकडून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप सुरु असल्याचा आरोप माजी उपाध्यक्ष श्री. जाधव यांनी केला आहे. 

साडेतीन पिठापैकी एक माहूर हे तीर्थक्षेत्र चे ठिकाण असल्याने येथे ट्रामा केअर युनिट अथवा ५० खाटच्या ग्रामीण रुग्णालयासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी प्रयत्न केले. मात्र, मागील सरकारच्या काळात या कामास मंजूनी मिळाली नाही. रुग्णालयाची मोडकळीस आलेली इमरात त्यातच रुग्णांची वाढती लोकसंख्या रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सहा महिन्यापूर्वी मंजूर करण्यात आला. दरम्यान, रुग्णालयाच्या विस्तारीत इमारत कामास प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे विस्तरिकरण थांबले होते. नियोजीत कामास प्रशासकीय मान्यता कधी मिळाली हे जाहीर आहे. 

हेही वाचा-‘सीएचबी’ प्राध्यापक आठ महिण्यापासून त्रस्त
 
जिल्हा नियोजन समितीची मान्यता 
 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नुकतीच माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुती व शस्त्रक्रिया कक्षाच्या इमारत कामासाठी ९७ लाख ३६ हजार रुपयाच्या निधीस जिल्हा वार्षिक योजनेतून मान्यता मिळाली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीत इमरातीच्या कामास माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या कार्यकाळातच मंजुरी मिळून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यामुळे विद्यमान आमदार श्री. केराम यांनी न केलेल्या रुग्णालय इमरातीच्या विस्तारीत कामाचे श्रेय घेण्याचा करु नये असा निर्वानिचा इशारा उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी दिला आहे.  

येथे क्लिक करा- धक्कादायक...! नांदेडात अवैध शस्त्रागारावर छापा
  
सिंचन विहीरीचाही श्रेयवाद 
जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई बैठकीत मागील आठवड्यामध्ये मनरेगाअंतर्गत तालुक्यात ५२ सिंचन विहिरी तत्कालीन उपाध्यक्ष या नात्याने स्वत: मंजूर केल्या आहेत. पण याही कामाचे आमदार श्री केराम श्रेय घेवू पाहत असल्याचा आरोप माजी उपाध्यक्ष श्री. जाधव यांनी केला आहे. 

श्रेयवादाची बाधा पोहचू नये 

राज्याचे आर्थिक बजेट चे अधिवेशन आजुन व्हायचे आहे, तुम्ही बजेट मध्ये कामे मंजूर करून आना आणि श्रेय घ्या आमची हरकत नाही, मात्र, मतदार संघाच्या विकासाला श्रेयवादाची बाधा पोहोचू नये याची काळजी आमदार श्री केराम यांनी घ्यावी 
समाधान जाधव : जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Proposal: इराणची मोठी हालचाल! अमेरिकेला नवा १४ कलमी अणुकराराचा प्रस्ताव पाठवला, कोणत्या अटी ठेवल्या?

बीसीसीआयला RTI कायद्यातून वगळले! CIC चा महत्त्वाचा निर्णय; कारण काय दिले ते वाचा...

ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा! १०० वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, १२ जणांचा मृत्यू, घटनास्थळावरील थरारक व्हिडिओ समोर

Iran War Preparation : इराण झुकण्यास तयार नाही! ट्रम्प यांच्या धमकीनंतर इस्लामी सरकारचा मोठा निर्णय? लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच हाती दिली AK-47

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT