Latur Crime News  sakal
मराठवाडा

Latur Crime News : मुलीला जीवे मारून वडिलांनी संपवले जीवन ; आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून घटना

सहावर्षीय मुलीला खून करून तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी शहरात घडली. येथील मोतीनगर भागात अभय लक्ष्मीनिवास भुतडा (वय ३६) हे पत्नी सुनैना, मुलगी नौव्या (वय ६) हिच्यासह भाड्याच्या घरात राहत होते.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : सहावर्षीय मुलीला खून करून तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी शहरात घडली. येथील मोतीनगर भागात अभय लक्ष्मीनिवास भुतडा (वय ३६) हे पत्नी सुनैना, मुलगी नौव्या (वय ६) हिच्यासह भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे याच भागात ‘अवंती नाष्टा सेंटर’ नामक हॉटेल आहे. त्यांची सासरवाडीही मोतीनगरमध्येच आहे.

सुनैना व नौव्या भुतडा या चार दिवसांपूर्वी माहेरी वडील गोविंद मुंदडा यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. अभय भुतडा हे दररोज जेवणासाठी सासरी जात होते. त्यानुसार अभय भुतडा आज सकाळी सासरी गेले. मुलगी नौव्या हिला गुजराती इंग्लिश स्कूलमध्ये सोडतो असे म्हणून तिला घेऊन ते घराबाहेर पडले. सकाळी सव्वादहाच्या सुमारास सासरच्यांनी फोन केला पण अभय यांनी उचलला नाही.

त्यानंतर सुनैना यांनी मुलगी नौव्या हिच्या शाळेत फोन करून विचारणा केली. ‘तिचे वडील तिला शाळेत घेऊन आले होते; पण लगेच परत घेऊन गेले’ असे शाळेतून त्यांना सांगण्यात आले. अभय यांच्या तपासासाठी सासरे मुंदडा हे त्यांच्या घरी गेले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता, प्रतिसादही मिळत नव्हता. घराचा दरवाजा तोडण्यात आला.

घराच्या हॉलमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत नौव्या तर बाजूलाच अभय भुतडा यांनीही गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी दोघांना शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. अभय भुतडा गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत होता. यातूनच त्याने मुलगी नौव्या हिचा गळफास देऊन खून केला व स्वतः आत्महत्या केली, अशी फिर्याद मुंदडा यांनी दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shocking Incidents 2025: पुणेकर कधीही न विसरणाऱ्या १५ घटना! आजही अंगावर काटा येतो, भयानक होतं २०२५

Valhe News : अभ्यासिका नव्हे... ही तर स्मशानभूमी! आडाचीवाडी येथील विद्यार्थी एकत्र येत दररोज करतात अभ्यास

Farmer Schemes : शेतकऱ्यांसाठी सरकारची पेन्शन योजना; दरमहा मिळणार 3000 रुपये! जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

Success Story: शेतमजुराच्या मुलाची ‘एअर फोर्स’मध्ये निवड; अभिषेक सास्तेची प्रेरणादायी कहाणी

Kolhapur Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आई-वडिलांना बेदम मारहाण; मुलाने डोक्यात घातला लोखंडी बार

SCROLL FOR NEXT