dharashiv
dharashiv  sakal
मराठवाडा

Dharashiv News : धाराशिव शहरात अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न गंभीर

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : शहरात अनधिकृत नळजोडण्या असल्याची बाब नगरपालिका प्रशासनासमोर आत्ता आली आहे. ज्यांच्याकडे अनाधिकृत नळजोडणी आहे. अशांनी शुल्क भरून त्या अधिकृत करून घ्याव्यात. मुदतीनंतर अनधिकृत नळजोडणी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याची तंबी नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र यास प्रतिसाद मिळाला नाही तर, अनधिकृत नळजोडण्या कशा शोधणार. हा प्रश्न कसा सोडवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

घरगुती अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी ४ हजार रुपये, व्यावसायिक अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. ज्यांच्याकडे अश्या अनधिकृत जोडण्या आहेत. ते, हे शुल्क भरून, आपण अनधिकृत नळ जोडणी घेतली होती, हे सांगण्यास पुढे येतील का ? हा प्रश्नच आहे.

नळजोडणी घेताना मुख्य जलवाहिणीला नळ जोडावा लागतो. यासाठी मुख्य जलवाहिनी कोठे आहे. ते शोधून तिला जोडणी द्यावी लागते. त्या त्या भागात कार्यरत, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यासच हे ठाऊक असते. सामान्य नागरिक अगदी राजरोसपणे खड्डा खोदून अनधिकृत नळजोडणी घेऊ शकत नाही. संबंधित यंत्रणेतील माहितीगाराच्या सहकार्याशिवाय अशी जोडणी घेता येणे कठीण असते. असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. मग पालिका प्रशासन अनधिकृत नळजोडण्या शोधणार कशा ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आम्ही यासाठी सुरवात केली आहे. यावर काय प्रतिसाद मिळतो. ते पाहावे लागेल. पुढे काय करावे याचा निर्णय यानंतर घेण्यात येईल.

- वसुधा फड, मुख्याधिकारी, नगर परिषद, धाराशिव.

अनधिकृत नळजोडण्या हजारांत

अनधिकृत नळजोडण्या हजारांत असण्याची शक्यता आहे. मात्र या जोडण्या शोधणे हे आव्हान असणार आहे. त्यासाठी नगरपालिकेकडे अद्याप नियोजन नाही. या जोडण्या देण्यात गुंतलेल्यांवर काय कारवाई होणार. याचीही स्पष्टता नाही. आमची जोडणी अनधिकृत आहे. असे सांगण्यास कोण पुढे येईल.

आले तर ती नळजोडणी कोण दिली होती. हे उघड होईल. ती जोडणी देणाऱ्यास मोकळे सोडणार का हा प्रश्न आहे. २०११च्या जनगणनेनूसार शहराची लोकसंख्या १ लाख ११ हजार आहे. २१ हजारांवर घरांची संख्या आहे.

यातून नळजोडण्या आहेत का? दरम्यानच्या काळात वाढलेल्या घरात नळजोडण्या दिल्यात का? याची आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मग अनधिकृत नळजोडण्या शोधणार कश्या ? हा प्रश्न कायम आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT