Bidkin Vaibhav pawar 
मराठवाडा

Bidkin : अजित सिड्स कंपनीतील २४ वर्षीय कामगाराचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ..

Bidkin : बिडकीनमधील अजित सिड्स कंपनीत एक कामगार गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. नातेवाईकांनी या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

(रविंद्र गायकवाड)

बिडकीन : येथील फारोळा गावानजीक असलेल्या गट क्रमांक १०० मधील अजित सिड्स कंपनीत एका कामगाराचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना आज (ता.१५) मंगळवार रोजी सकाळच्या वेळी उघडकीस आली आहे.

वैभव युवराज पवार वय. २४ वर्ष, लिंबगाव,ता.पैठण असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे.तब्बल तीन ते चार दिवसांपासून हा गळफास घेतलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह असल्याने घातपात असल्याचा संशय नातेवाईकांच्या वतीने घेण्यात येत असल्याने तब्बल कंपनी व्यवस्थापन व पोलिस अधिकारी यांनी समंजसपणा दाखवून मृतदेह ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे हलविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वैभव पवार हा फारोळा हद्दीतील गट क्रमांक १०० मधील अजित सिड्स कंपनीच्या आवारात कामगारांना दिलेल्या घरात राहत होता तर गट क्रमांक ७२ मधील अजित सिड्स कंपनीत मेंटेनन्स सुपरवायझर म्हणून मागील काही वर्षांपासून काम पाहत होता.मागील काही दिवसांपुर्वी कंपनीला दसरा व रविवार सुट्टी असल्याने वैभव बाहेर न पडला असावा परंतु आज कामगारांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह पाहिला असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापन आणि पोलिसांना दिली आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून वैभव पवार घराबाहेर किंवा कंपनीच्या कामाला आला कि नाही किंवा यामागील अडचणी काय आहेत हे पाहण्यासाठी ना सुरक्षारक्षक गेला,ना कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी गेला,तर माझ्या भावाचा घातपात झाला असा आरोप मृताचे नातेवाईकांच्या वतीने केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक अशोक माने, सहायक पोलिस फौजदार निकाळजे, तांगडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल धनेधर, मगर, गायकवाड,राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे हलविण्यात आला आहे.बिडकीन पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक माने हे करित आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT