file photo 
मराठवाडा

मिरचीपुड डोळ्यात टाकत मारहाण 

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा, डासाळा (ता.सेलू) या बँकेत शाखाधिकारी व रोखपाल रोख रक्कम घेऊन जात असतांना त्यांच्या दुचाकीस चोरट्यांनी दुचाकीची धडक देऊन डोळ्यात मिरची पुड टाकली. त्यांच्या हातातील  दोन लाख रूपये रोकड असलेली बॅग पळविल्याची घटना सोमवारी (ता.३०) सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली. घटनेचा पंचनामा सेलू पोलिसांनी केला असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले.

पुन्हा दुचाकीवरील चोरट्यांचा धुमाकुळ
डासाळा (ता.सेलू) येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेत बँक शाखाधिकारी म्हणून के. एन. मांडे तर रोखपाल म्हणून पवन फुलमाळी हे कर्मचारी कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे सोमवारी त्यांनी सेलू बॅंकेच्या शाखेतून सुमारे तीन लाख रूपयांची रोकड घेतली. ते देऊळगाव (गात) ते डासाळा या रस्त्यावर दुचाकीवरून बँकेची रोकड घेऊन जात असतांना त्यांच्या समोरून दोन दुचाकीवर चार चोरटे आले. 

नागरिकांत भितीचे वातावरण 
त्यांच्या दुचाकीस धडक दिली. रोखपाल पवन फुलमाळी हे दुचाकी चालवत असल्याने त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकत मारहाण करण्यात आली. तसेच रोकड घेऊन पाठीमागे बसलेले शाखाधिकारी के. एन. मांडे यांना या चोरट्यांनी दगड, काठ्यांनी मारहाण करित त्यांच्याकडील बँकेची रोकड असलेल्या सुमारे दोन लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत घटनेची पाहणी केली. त्या दोन्ही बॅक कर्मचाऱ्यावर येथील उपजिल्हा रूग्नालयात उपचार सुरू आहेत. चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सेलू पोलिस ठाण्यात सुरू आहे.

बॅंकेची सुरक्षा वाऱ्यावर...
परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सेलू तालुक्यात अनेक शाखा आहेत. परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून चारचाकी वाहणातून केवळ सेलू तालुका शाखेत रोकड काळजी पूर्वक पाठविली जाते. मात्र, तालुका शाखेतून ग्रामीण भागात असलेल्या शाखेत रोकड नेण्याची जबाबदारी तेथील कर्मचाऱ्यांवर टाकली जाते.`ते कर्मचारी या जोखमीची जबाबदारी जीव मुठित धरून करतात. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT