Osmanabad News
Osmanabad News 
मराठवाडा

Coronavirus : उमरगेकरांची उडाली झोप; राष्ट्रीय महामार्गासह परिसर सील

अविनाश काळे

उमरगा : उमरगा शहरातील एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तिसरा रुग्ण असल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासुन शहरातील राष्ट्रीय महामार्गासह एक किलोमीटरचा परिसर केला सिल केले आहे. 

उमरगा तालुक्यातील एक, तर लोहारा तालुक्यातील एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने या दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तसेच शहरातील दोघांचा शोध घेऊन शुक्रवारी (ता. तीन) ३९ जणांना उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते, त्यातील ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

शनिवारी (ता. चार) रात्री अकरा वाजता अहवाल प्राप्त झाला. त्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एक तरुण दिल्ली परिसरात धार्मिक कार्यक्रमाला गेला होता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने सतर्कता म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासुन शहरातील राष्ट्रीय महामार्गासह एक किलोमीटरचा परिसर केला सील केले आहे. 

उमरगा शहर व तालुक्यात बाहेरून आलेल्या तीस जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासाजनक बाब होती मात्र एक एप्रिलला पानिपत- दिल्ली मार्गे तालुक्यात  परतलेला एक तरुण व त्याची पत्नीपैकी तरूणाचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

प्रशासनाने तरुणाच्या कुटुंबासह नातेवाईकाचे चौदा, आणि संपर्कात आलेल्या पंधरा जणांना स्वॅब तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उमरगा शहरातील एक विवाहित तरुण व त्याची आई दिल्ली शहराजवळील एका गावात धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते त्यांचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. 

लोहारा तालुक्यातील एक तरुण पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत, त्याच्या आठ  नातेवाईकांना तपासणीसाठी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री पूणे येथे पाठविलेल्या ३० जणाचा अहवाल शनिवारी रात्री उशीरा प्राप्त झाला, त्यातील २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, मात्र शहरातील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

वैद्यकिय अधिक्षक डॉ. पंडीत पुरी यांनी अहवाल प्राप्त होताच त्या तरुणावर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान प्रशासनाने शनिवारी रात्रीच या तरूणाच्या कुटूंबातील चौघांना उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे.

प्रशासनाने केला परिसर सील

कोरोनाग्रस्त तरूणाचे घर राष्ट्रीय महामार्गावरच आहे. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक अमोल मालुसूरे, विजयकुमार वाघ,नायब तहसीलदार विलास तरंगे, डॉ. रोहन काळे, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्रीच राष्ट्रीय महामार्गावरील अशोक चौक, आरोग्यनगरी कॉर्नर तसेच हुतात्मा स्मारकाजवळील पुलावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला आहे. शहरातील अनेक गल्लीत नागरिकांनी रस्ता बंद करण्याचे काम सूरू केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT