file photo 
मराठवाडा

नुकसानग्रस्तांसाठी ६६ कोटींचा तिसरा हप्ता मिळाला

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी जिल्ह्याला दोन हप्त्यांत ३९२ कोटींचे वितरण नुकतेच झाले आहे. यानंतर उर्वरित एक लाख ८४ हजार ३६७ शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १०९ कोटींच्या तिसऱ्या हप्त्याची मागणी केली होती. यातील ६६ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने तो बुधवारी (ता. पाच) सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आला. यातून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी आठ हजारांनुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे.

५०७ कोटींची मागणी
जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात बाधित झालेल्या सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ५०७ कोटींची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. 

आजपर्यंत ३९२ कोटी प्राप्त  
‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर आठ हजार रुपये भरपाई देण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला १२३ कोटी १४ लाख रुपयांचा पहिला हप्ता, तर २६९ कोटींचा दुसरा हप्ता, अशा दोन हप्त्यांत एकूण ३९२ कोटी २२ लाख ९० हजार रुपये मिळाले आहेत. हा निधी जिल्हा स्तरावरून सोळा तालुक्यांना वितरीत करण्यात आला. यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या निधीची मागणी प्रस्तावित होती. 

६६ कोटींचा तिसरा हप्ता मिळाला 
जिल्हा प्रशासनाने एक लाख ८४ हजार ३६७ शेतकऱ्यांसाठी १०९ कोटी ३८ लाख ८५ हजार ७१४ रुपयांच्या तिसऱ्या हप्त्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. यातून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी आठ हजारांनुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे. हा निधी बुधवारी (ता. पाच) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर लगेच सोळा तालुक्यांना वितरीत करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर लागणारा ४३ कोटींचा शिल्लक निधी प्राप्त होताच तो वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तीन हप्त्यांत ४५८ कोटी मिळाले
जिल्ह्यातील सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यातील बाधित सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ५०७ कोटींची मागणी केली होती. यानुसार शासनाकडून तीन हप्त्यांत ४५८ कोटी ३८ लाख ७२ हजार रुपये मिळाले आहेत.

बुधवारी वितरीत करण्यात आलेला निधी
नांदेड - २.१७ कोटी, अर्धापूर - ८५ लाख, मुदखेड - ४.८० कोटी, कंधार - ७.१४ कोटी, लोहा - ६.७७ कोटी, देगलूर - ५.६२ कोटी, मुखेड - ६.३७ कोटी, नायगाव - ४.६० कोटी, बिलोली - ३.५९ कोटी, धर्माबाद - १.८१ कोटी, किनवट - चार कोटी, माहूर - २.२२ कोटी, हिमायतनगर - तीन कोटी, हदगाव - ६.५५ कोटी, भोकर ३.६९ कोटी व उमरी २.८१ कोटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT