IMG-20200404-WA0021.jpg 
मराठवाडा

पंतप्रधान सहाय्यता निधीला दिला ५१ हजाराचा धनादेश

विनोद आपटे


मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः मुलीच्या वाढदिवसावर होत असलेला अनाठायी खर्च टाळून ग्राम पंचायत सदस्य बालाजी बोधणे यांनी देशात फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरस या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बोधणे यांनी शनिवारी (ता.चार)  रोजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्याकडे ५१ हजाराचा धनादेश सुपुर्द केला.

अनेकांचे रोजगार बुडाले

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शिवाजी महाविद्यालयात खासदार प्रताप पाटील चिखलीकर व व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या प्रमुख उपस्थित कोरोना आजाराच्या पाशर्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या वेळी गरजु व गरीब नागरिकांना भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्याकडून अन्नधान्य वाटप करण्यात आले. तर बालाजी बोधने यांच्याकडून पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराचा धनदेश देत वार्ड क्रमांक ४ व ६ या वार्डातील नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. भारतात कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले असून याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर व कामगार, मजुरदार यांचा दैनंदिन जिवनात पडला असून अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.

या मुळे या लोकांना अन्नधान्य कमी पडणार नाही याची काळजी घेत शहरातील गरजुंना अन्नधान्य वाटप करण्यात आले.  या वेळी भाजपचे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपचे देगलुर तालुका अध्यक्ष शिवाजी कनकंठे, श्रावण भिलवंडे, सुभाषअप्पा बोधणे, सदाशीव बोयवार आदींची उपस्थिती होती.

मास्कचे वाटप

तर कोरोना सारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी आरोग्य व पोलिस प्रशासन हे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. तर देशातील खऱ्या परिस्थितीचे वार्तांकन करून देश सेवा करीत असून यांना कोरोना आजार होऊ नये म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून सॕनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सदाशीव बोयवार यांनी केले, तर आभार बालाजी बोधने यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चौथ्या T20I मध्ये भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव'या'३ मोठ्या चुकांमुळे मालिका गमावली,गंभीर हतबल, एकटा कर्णधार श्रेयस करणार तरी काय?

Ashta Bhavai Festival : 1200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा! सांगलीच्या आष्ट्यात आजपासून प्रसिद्ध 'भावई उत्सव'; काय आहे खास? महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचं आहे श्रद्धास्थान

Snake Safety in Monsoon : सापाची पिल्ले दिसायला लहान, पण जन्मापासूनच असतात विषारी; पावसाळ्यात शेतात जाताना 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी, सर्पदंशानंतर नकोत घरगुती उपाय

Student End Life : गृहपाठ न केल्याने २० रुपयांचा दंड; आठवीतील विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून उचललं टोकाचं पाऊल, नोटमध्ये नेमकं काय?

दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत, चांगलं कमावता, एकत्र कुटुंबात राहता मग घरखर्च कोण करतं? अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं आर्थिक गणित

SCROLL FOR NEXT