Three new Covid-19 cases in Latur
Three new Covid-19 cases in Latur 
मराठवाडा

Covid-19 : लातुरातील क्रांतीनगरात दोन तर बाभळगावात पुन्हा एक रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १२) तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील दोन रुग्ण नवीन असून ते शहरातील क्रांतीनगर भागातील आहेत. तिसरा रुग्ण हा बाभळगाव (ता. लातूर) येथे गुरूवारी (ता. ११) पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.

रोज नवीनच भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने लातूरकरांची चिंता वाढली आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरूवारी तपासणीसाठी आलेल्या तीन व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. शुक्रवारी त्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल इन्क्लूझिव्ह आला आहे. 

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या या दोन्ही व्यक्ती नवीन रुग्ण असून त्या शहरातील क्रांतीनगर भागातील अाहेत.  त्या कोठून आल्या आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान शुक्रवारी एकूण ८७ व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ८० नमुने निगेटिव्ह तर दोन इन्क्लुझिव्ह आले. चार रिजेक्ट करण्यात आले व एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा व्यक्ती बाभळगाव येथील असून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील असल्याची माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली. तीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील लातूर कोरोना मीटर रुग्णसंख्या १७३ झाली आहे. यात उपचार सुरू असलेले ३७ तर बरे झालेले १२८ रुग्ण असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT