download
download 
मराठवाडा

तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण

कैलास चव्हाण

परभणी ः प्रधानमंत्री ग्राम आवास योजनेत तीन वर्षांत जिल्ह्यात तीन हजार २९९ नव्या घरकुलांचे बांधकामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित मंजुरी दिल्यापैकी ५६० घरकुलांचे काम सुरू आहे, तर नव्याने २०१९-२० मध्ये ८३३ घरकुलांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.

बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या मदतीने प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भागासाठी सुरू केली. त्यामध्ये ग्रामीण भागात लाभार्थींना एक लाख २० हजार रुपये आणि स्वच्छ भारत मिशनकडून स्वच्छतागृह बांधकामासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. 

तीन हजार २९९ घरकुलांचे काम पूर्ण
परभणी जिल्ह्यात २०१६-१७ आणि २०१८-१९ या वर्षात जिल्ह्याला तीन हजार ९७५ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यातील तीन हजार ८५९ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी तीन हजार २९९ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत लाभार्थींना चार हप्ते देण्यात आले आहेत. उर्वरित ५६० घरकुलांचे काम सध्या सुरू झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली आहे. उद्दिष्ट साध्य होण्याचे प्रमाण ८२.९९ टक्के एवढे आहे.

या वर्षात ७३ कामे पूर्ण 
नवीन २०१९-२० या वर्षात जिल्ह्याला ८३३ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यातील ७७६ घरकुलांना मंजुरी देऊन ७३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. हे प्रमाण ८.७६ टक्के एवढे आहे.


तालुका   मंजूर घरकुल   पूर्ण संख्या
गंगाखेड       ४८४           ४०७
जिंतूर          ८८१           ७५२
मानवत        २२२           १९७
पालम         ५१५            ४२५
परभणी        ५२५            ५०२
पाथरी          ३०६            २८०
पूर्णा            ३२१            २७१
सेलू            २९३            २५४
सोनपेठ         २७७            २११
एकूण           ३८५९          ३२९९

.....वाळूचा अडथळा
जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव दोन वर्षांपासून झाला नसल्याने सध्या अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू आहे. त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी वाळूचे भाव वाढविले आहेत. त्याचा परिणाम बांधकामावर झाला आहे. तसेच घरकुल बांधकामांनादेखील वाळूचा फटका बसत आहे. गतवर्षी महसूल विभागाने घरकुल लाभार्थींना वाळू उपलब्ध करून दिली होती. यंदा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून तसा पत्रव्यवहार महसूल विभागाला करण्यात आला आहे. 


वालूरला स्वच्छतागृह बांधकाम पाहणी
वालूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छतागृह बांधकामाची गुरुवारी (ता.१६) पाहणी करून आढावा घेण्यात आला. वालूर (ता. सेलू) ग्रामपंचायत कार्यालयालयांतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेतील स्वच्छतागृह उभारणीचे काम सुरू असून तालुक्यातील सर्वांत जास्त स्वच्छतागृह उद्दिष्ट वालूर गावास आहे. गावातील जवळपास एक हजार ६०८ स्वच्छतागृह  बांधकामाचे लाभार्थी आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतने नागरिकांनी स्वच्छतागृह बांधकाम करून वापर करावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT