औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वाघीन समृद्धी व तिचे बछडे.
औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वाघीन समृद्धी व तिचे बछडे. 
मराठवाडा

प्राणिसंग्रहालयात हलला पाळणा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांनंतर शुक्रवारी (ता. २६) रात्री पाळणा हलला. वाघीण समृद्धीने चार बछड्यांना जन्म दिला असून, बछड्यांच्या जन्माचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले. या बछड्यांच्या जन्मामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या आता १२ वर गेली आहे. 

मराठवाडा, विदर्भासाठी एकमेव असलेल्या महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयात एक पांढरा, सात पिवळ्या वाघांसह दीडशेहून अधिक प्राणी आहेत. प्राणिसंग्रहालयात अपुरी जागा असल्यामुळे काही काळ वाघ व वाघिणींना वेगवेगळ्या पिंजऱ्यांत ठेवण्यात येत होते. मात्र वाघांची देशातील घटती संख्या लक्षात घेऊन दोघांना पुन्हा सहवासात सोडण्यात आले होते.

तीन महिने १६ दिवसांनंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता समृद्धीने पहिल्या बछड्याला जन्म दिला. त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आणखी तीन बछड्यांना जन्म दिला. सिद्धार्थ उद्यानातील वाघांची संख्या आता १२ वर गेली आहे. दोन वर्षांपूर्वी समृद्धी व सिद्धार्थपासून तीन बछडे झाले होते. त्यातील एक पांढरा वाघ होता. बछड्यांचा जन्म झाल्याची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी (ता. २७) दुपारी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन माहिती घेतली व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पेढे वाटून बछड्यांच्या जन्माचे स्वागत केले. समृद्धी व चारही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून, तीन महिने त्यांची काळजी घ्यावी लागणार असल्याचे डॉ. नीतिसिंग चौहान यांनी सांगितले. 

सर्वाधिक वाघ औरंगाबादेत 
राज्यात मुंबई, पुणे, नागपूरसह इतर ठिकाणी प्राणिसंग्रहालय आहेत. मात्र सर्वाधिक १२ वाघ शहरातील प्राणिसंग्रहालयात आहेत. २००५ मध्ये महापालिकेने चंडीगड येथून गुड्डू, दीप्ती, कमलेश, छोटू असे चार वाघ आणले होते. त्यांच्यापासून आतापर्यंत १६ वाघ जन्मले आहेत. मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी महापालिकेने वाघ दिले आहेत, असे प्राणिसंग्रहालय संचालक विजय पाटील यांनी सांगितले. 

औरंगाबादेतील वाघांना मुंबईतून मागणी आहे. मात्र, महापालिकेने मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाघ इतर ठिकाणी न देता, शहरातच ठेवण्याचे प्रयत्न राहतील.
- नंदकुमार घोडेले, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT