औरंगाबाद - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हरिभाऊ बागडे आणि बबनराव लोणीकर यांच्या हस्ते स्वीकारताना हिवरेबाजार येथील ग्रामस्थ.
औरंगाबाद - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हरिभाऊ बागडे आणि बबनराव लोणीकर यांच्या हस्ते स्वीकारताना हिवरेबाजार येथील ग्रामस्थ. 
मराठवाडा

स्वच्छतागृहांचे अनुदान लवकरच

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - ‘‘स्वच्छतेसंदर्भात गेल्या तीन वर्षांत १८ लाख कुटुंबांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्यातून झालेल्या जागृतीमुळे ६० लाख वैयक्‍तिक स्वच्छतागृहे बांधली गेली. त्यासाठी चार हजार ४७२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आता केंद्राकडून एक हजार ३५२ कोटींचा निधी नुकताच मिळाला आहे. त्यामुळे स्वच्छतागृहे बांधून तयार आहेत; पण अनुदान मिळाले नाही, अशा अनेकांचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी सांगितले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम (२०१६-१७) पुरस्कारांचे वितरण येथे आज झाले. त्या वेळी लोणीकर बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पोपटराव पवार आदी या वेळी उपस्थित होते.

हिवरेबाजारला प्रथम पुरस्कार 
हिवरेबाजार (जि. नगर) ग्रामंचायतीला २०१६-१७ चा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम’ हा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. राज्यस्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांना दिला जाणारा प्रथम पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेला दिला. द्वितीय पुरस्कार मान्याची वाडी (जि. सातारा), शेळगाव गौरी (जि. नांदेड), तर तृतीय पुरस्कार धाटाव व राजगड (जि. रायगड) या ग्रामपंचायतींना विभागून देण्यात आला. अवनखेड (जि. नाशिक), अचलपूर (जि. अमरावती), पांगारखेडा (जि. बुलडाणा) ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT