अहमदपूरः कचर्यात टाकलेले टोमॅटो 
मराठवाडा

भाव उतरल्याने टोमॅटो कचराकुंडीत

उदयकुमार जोशी

अहमदपूर(जि. लातूर) ः टोमॅटोचे भाव उतरल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात बसल्या ठिकाणीच टोमॅटो टाकून देऊन आपल्या गावचा रस्ता धरला. पर्यायाने नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी टोमॅटोंना कचराकुंडीचा रस्ता दाखविला. 


सोमवारी (ता. नऊ) शहरात बाजारचा दिवस असतो. त्यामुळे परिसरातील भाजी विक्रेते मोठ्या संख्येने आपला भाजीपाला विक्री करण्यासाठी शहरात येतात. जिल्हा परिषदेच्या मैदानावर, न्यायालयासमोरच्या मोकळ्या जागेत हा आठवडे बाजार भरतो. 


सकाळी सातपासूनच शहरात भाज्यांची आवक सुरू होते. ऑटो रिक्षा, टेंपोच्या माध्यमातून ही भाजी शहरात आणली जाते. गावापासून शहराच्या अंतरानुसार व भाजीच्या वजनानुसार शेतकऱ्यांकडून वीस रुपये ते शंभर रुपये असा किराया आकारला जातो. शिवाय स्वतः शेतकऱ्याचे प्रवास भाडे वेगळेच. 


त्यामुळे भाजी विक्रीची सुरवात होण्याआधीच शेतकऱ्यांना आपल्याजवळील कमीत कमी शंभर रुपये गुंतवावे लागतात. आठवडे बाजारात सकाळपासून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक सुरू होती. दुपारी बारा वाजेपर्यंत टोमॅटोचा भाव प्रतिकिलो चार रुपये या दराने लावण्यात आला. परंतु, टोमॅटो मोठ्या प्रमाणात आल्याने लगेचच हा भाव दोन रुपये प्रतिकिलो करण्यात आला. मात्र, एवढा कमी भाव होऊनही विक्री होत नव्हती. शेवटी टोमॅटोचे ओझे गावाकडे परत कशाला न्यायचे हा विचार करीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बसलेल्या जागेवरच टोमॅटो टाकून दिले. नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ते कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीत टाकून दिले. हे सारे हताश नजरेने पाहण्याशिवाय टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काहीच नव्हते. 

केवळ टोमॅटोच नव्हे, तर कांदा वगळता सर्वच भाजीपाला अतिशय स्वस्त दरात विकला जात होता. गवार, घेवड्याच्या शेंगा, मुळा, काकडी या भाज्या वीस रुपये प्रतिकिलो या भावाने विकल्या जात होत्या. त्यामुळे या भाजी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च तरी मिळेल अशी अपेक्षा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT