gym.jpg
gym.jpg 
मराठवाडा

उद्यापासून मारा जोर बैठका, जीम, व्यायामशाळा सुरु! काय असणार नियमावली.  

माधव इतबारे

औरंगाबाद : हॉटेल, बियरबारनंतर आता राज्य सरकारने मिशन बिगेनअंतर्गत जीम, व्यायाम शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार रविवारपासून (ता. २५) म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर जीम, व्यायाम शाळा सुरु होणार आहेत. व्यायाम करताना प्रत्येकामध्ये सहा अंतर ठेवावे लागेल, असे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत. 

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजेच गेल्या सहा महिन्यांपासून जीम, व्यायामशाळा बंद होत्या. काही महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे जीम, व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्य शासनाने निर्णय? घेतला आहे. शासनाने परवानगी देताच महापालिकेने देखील यासंदर्भात आदेश काढले आहेत. व्यायाम शाळा सुरु करताना मात्र नियमांचे कठोरपणे पालन करावे लागेल असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

अशा आहेत अटी 

  • -व्यायाम शाळा परिसरात फेस कव्हर, मास्कचा वापर अनिवार्य असेल. 
  • -व्यायाम करताना मास्कमुळे श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे फक्त व्यायाम करताना मल्टी लेअर, सिंगल लेअर सुती कपडयांचे मास्क वापरणे योग्य राहील. 
  • -कमीत कमी ६० सेंकदपर्यंत साबणाने हात धुणे आवश्यक राहील. 
  • -व्यायाम शाळेतील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याचे स्वपरिक्षण करणे व आजार निदर्शनास आल्यास महापालिकेच्या हेल्पलाईनला नोंद करणे बंधनकारक राहील. 
  • -सार्वजनिक परिसर, व्यायामाच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई राहील. 
  • -दहा वर्षाखालील व ६५ वर्षावरील व्यक्तींना बंद व्यायाम शाळेत प्रवेश बंदी राहील. 
  • -व्यायाम शाळा उघडण्यापूर्वी व बंद करतेवेळी सॅनेटाईज (निर्जंतुकीकरण) करून घेणे बंधनकारक राहील. 
  • -प्रत्येक व्यायाम शाळेसमोर सॅनिटायझरची व्यवस्था करावी. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT