Latur Corona News
Latur Corona News 
मराठवाडा

Latur Breaking : लातुरात अडत व्यापाऱ्याला कोरोनाची लागण

हरि तुगावकर

लातूर : लातूर शहरातील मोतीनगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी (ता.२८) रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती अडत व्यापारी आहे. तसेच त्याला कोणत्याही प्रवासाचा इतिहास नाही. तो कोणाच्या तरी संपर्कात आल्याने बाधीत झालेला आहे. त्यामुळे शहरात अशा पद्धतीचा पहिलेच प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना, अडत व्यापाऱ्यांना आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हा रुग्ण नवीन भागातील असल्याने शहराती रुग्णांची संख्या दहावर गेली असून प्रतिबंधित क्षेत्राची संख्या चारवर गेली आहे.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गुरुवारी संस्थेतील २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.

त्यापैकी २२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती मोतीनगर लातूर येथील रहिवासी आहे. तो अडत व्यापारी आहे. बुधवारी तो उपचारासाठी या संस्थेत आला होता. त्याला कोरोना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ.मारुती कराळे यांनी दिली. या रुग्णामुळे लातूर शहरातील रुग्णांची संख्या दहावर गेली आहे, तर प्रतिबंधित क्षेत्राची संख्या चारवर गेली आहे. पण आतापर्यंतच्या रुग्णांना पुणे, मुंबई, ठाणे प्रवासाचा इतिहास होता. पण आजचा हा रुग्ण अडत व्यापारी आहे. त्याला प्रवासाचा इतिहास नाही. कोणाच्या तरी संपर्कात आल्याने तो बाधित झाला आहे. अशा प्रकारचा शहरातील तो पहिलाच रुग्ण आहे. त्यामुळे आता नागरिक तसेच अडते, व्यापाऱ्यांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे.


उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातून आठ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच 8 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चाकूर येथील तीनपैकी तीन, निलंगा येथील तीन पैकी तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अहमदपूर येथील नऊ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच नऊ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जळकोट येथून पाच व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच पाच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोविड केअर सेंटर, लातुर येथील आठ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल ईनकनक्लेझीव्ह आले आहेत. लातूर जिल्ह्यातील असे एकूण ५९ स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ५६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन व्यक्तींचे अहवाल ईनकनक्लेझीव्ह आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोना मीटर
लातूर जिल्हा
एकूण बाधित रुग्ण- १२०
उपचार सुरु असलेले रुग्ण- ५९
बरे झालेले रुग्ण- ५८
मृत्यू- तीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT