train train
मराठवाडा

नंदीग्राम, पनवेल, राज्यराणीसह ६ तपोवन एक्स्प्रेस पाच दिवस बंद

गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिवहन सेवा ठप्प झाली आहे. यात रेल्वेच्या अनेक गाड्यांना अडचण आली

अनिल जमधडे

औरंगाबाद: इगतपुरी-कसारा कल्याण घाटांमध्ये अतिपावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे, काही ठिकाणी रेल्वेपटरीवर आलेल्या पाण्यामुळे तर काही ठिकाणी रेल्वेपटरी वाहून गेल्यामुळे मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यात नंदीग्राम, पनवेल, राज्यराणी, तपोवन रेल्वे शनिवार ते मंगळवारपर्यंत तर काही सेवा बुधवारपर्यंत असे पाच दिवस बंद राहणार आहे. बाकी गाड्यांची माहिती शनिवारी कळणार असल्याचे जनसंपर्क विभागाने कळवले.

गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिवहन सेवा ठप्प झाली आहे. यात रेल्वेच्या अनेक गाड्यांना अडचण आली. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग करूनही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यभरातील अनेक रेल्वे पूर्णतः तर काही अंशतः बंद केल्या आहेत. शुक्रवारी काही रेल्वे गाड्या आल्या असल्या तरी त्यानंतर सायंकाळी पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे नंतरच्या सर्व गाड्या या चार दिवस बंद केल्या आहेत. गुरुवारी कसारा घाटातील दरड कोसळली होती. तिचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे शुक्रवारी दिवसा काही गाड्या धावल्या. मात्र शुक्रवारी पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे सर्वच गाड्या बंद केल्याचे संकेत रात्री दहा वाजता रेल्वे विभागाकडून मिळाले.

यात नांदेड विभागातील अनेक गाड्या पूर्णतः रद्द करण्यात येत आहेत. यात गाडी क्र. ०११४१ मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै पूर्णतः रद्द, क्र. ०११४२ आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम विशेष पूर्णतः रद्द, क्र. ०७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी विशेष पूर्णतः रद्द, क्र. ०७६१२ मुंबई-नांदेड राज्य राणी विशेष पूर्णतः रद्द, क्र. ०७६१३ पनवेल-नांदेड पनवेल विशेष पूर्ण रद्द, क्र. ०७६१४ नांदेड-पनवेल पनवेल विशेष पूर्ण रद्द, क्र. ०७६१७ नांदेड-मुंबई तपोवन विशेष पूर्णतः रद्द, क्र. ०७६१८ मुंबई-नांदेड तपोवन विशेष पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT