transgender marriage beed
transgender marriage beed esakal
मराठवाडा

तृतीयपंथी सपनासह बाळू बांधणार रेशीमगाठ

सकाळ वृत्तसेवा

बीड : तृतीयपंथी कायम उपेक्षेचे जीवन जगत असतात. मात्र, येथील सपना नामक किन्नरच्या आयुष्यात बाळू नामक प्रियकर आला असून तो तिच्याशी लग्नाची रेशीमगाठ बांधणार आहे. जागतिक महिला दिनी त्यांनी कायदेशीर लग्न करण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील असा हा पहिला विवाह ठरणार आहे.

तृतीयपंथी महिलांना सातत्याने अवमान सहन करावा लागतो. त्यांना शासकीय पातळीवर कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. मागच्या काही वर्षांपासून किन्नर महिलांचे प्रश्न अजेंड्यावर आले आहेत. त्यांना विविध कायदेशीर अधिकार देखील मिळायला सुरुवात झाली. मात्र, या घटकाचे व्यक्तीगत आयुष्य खुपच खडतर असते. त्यांच्यासोबत अत्याचारांचे प्रसंग घडतात. शासकीय सुविधांचा अभाव असतो. अशा घटकांचा जागतिक महिला दिनी सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड शाखेने घेतला आहे. तृतीयपंथी असलेल्या सपनासोबत रिलेशनशीपमध्ये असलेल्या बाळूला तिच्यासोबत लग्न करायचे आहे.

मात्र, तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अडचणी होत्या. या कामातही संघाने पुढाकार घेत त्यांचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष वैभव स्वामी, उपाध्यक्ष प्रतिभा गणोरकर आणि शेख आयेशा रफिक यांनी सांगितले. हे दोघे मागील तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्याही घरातून त्यांना विरोध आहे. दोघांच्या मर्जीने विवाहाच्या निर्णयात कायदेशीर हक्क देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT