Tuberculosis patient
Tuberculosis patient sakal
मराठवाडा

Tuberculosis Patient : जालना जिल्ह्यात क्षयरुग्णांची उद्यापासून शोध मोहीम

सकाळ वृत्तसेवा

जालना जिल्ह्यात तब्बल एक हजार १५९ क्षयरूग्णांची संख्या आहे. भविष्यात क्षयरोगाचा प्रसार होऊन रूग्ण संख्येत वाढ होऊ नये, यासाठी जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्णांची शोध मोहीम बुधवारपासून सुरू केली जाणार आहे.

जालना - जिल्ह्यात तब्बल एक हजार १५९ क्षयरूग्णांची संख्या आहे. भविष्यात क्षयरोगाचा प्रसार होऊन रूग्ण संख्येत वाढ होऊ नये, यासाठी जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्णांची शोध मोहीम बुधवारपासून सुरू केली जाणार आहे. या शोध मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण १७७ पथके स्थापन केली असून, आशा वर्कर्स आणि स्वयंसेवकांद्वारे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.

जिल्ह्यात आज घडीला एक हजार १५९ क्षयरुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील क्षयरोग नियंत्रण आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्रावर सतत क्षयरूग्णांचा शोध घेतला जातो. त्यात येत्या ता. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोग केंद्राकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ता. आठ मार्च ते ता. २१ मार्च या कालावधीत जिल्ह्यात क्षयरूग्ण शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अतिजोखमीच्या भागातील लोकसंख्येचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण केले जाणार आहे. शिवाय प्रत्येक घरातील सदस्यांची क्षयरोग आजाराची तपासणी केली जाणार आहे. या कामासाठी जिल्ह्यात १७७ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये २३४ आशा व पुरुष स्वयंसेवक यांचा समावेश आहे. या मोहिमेचे २३ पर्यवेक्षकांद्वारे पर्यवेक्षण करण्यात येणार असून, या मोहिमेचे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी हे संनियंत्रण करणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण दोन लाख ३६ हजार ७१२ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मोहिमेदरम्यान आशा, पुरुष स्वयंसेवक घरोघरी जाऊन ज्या व्यक्तींना दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपासून येणारा ताप, वजनात घट, भूक न लागणे, मानेवर व इतर ठिकाणी गाठी येणे इत्यादी लक्षणे असतील, अशा व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय लक्षणे आढळून आल्यास सदरील व्यक्तीचे तत्काळ थुंकी नमुने व क्ष-किरण तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये क्षयरोग आढळून आल्यास रुग्णास औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप यांनी दिली आहे.

पोषण आहार किटचे वाटप

ता. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात क्षयरोग जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, सायकल रॅली, आरोग्य क्षयरोग जनजागृती मेळावा, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान अंतर्गत उपचार सुरू असलेल्या क्षयरूग्णांपैकी संमती दर्शविलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप जालना स्टील असोसिएशन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

क्षयरुग्णांची संख्या

तालुका क्षयरुग्ण संख्या

जालना - ५२३

बदनापूर - ५३

जाफराबाद - ७०

घनसावंगी - ९५

परतूर - १००

मंठा - ९२

भोकरदन - १३५

अंबड - ९१

एकूण - १५९

तालुकानिहाय सर्वेक्षणासाठी तयार केलेली पथके

तालुका पथक संख्या

जालना - २६

बदनापूर - ११

जाफराबाद - १२

घनसावंगी - १२

परतूर - १५

मंठा - १०

भोकरदन - १६

अंबड - १५

एकूण - ११७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT