File photo 
मराठवाडा

तुळजाभवानी मंदिर उद्यापासून बंद

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर : (जि. उस्मानाबाद) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर मंगळवारपासून (ता. १७) भाविकांसाठी पूण॔पणे बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.

तुळजाभवानी मंदिर समितीची प्रशासकीय कार्यालयात मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे, प्रभारी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर समितीचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. १६) बैठक झाली. त्यावेळी या निण॔याची माहिती मंदीर समितीच्या वतीने पत्रकारांना देण्यात आली. या वेळी तुळजाभवानी मातेचे महंत, पुजारी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

योगिता कोल्हे म्हणाल्या, की राज्य सरकारच्या आदेशाप्रणाणे जिल्हादंडाधिकारी यांनी १५ मार्च रोजी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सूचना केल्या आहेत. त्यानुसार 
तुळजाभवानी मंदिर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे.

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक येत असतात. रविवारी (ता. १५) दिवसभरात सुमारे १३ हजार भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मातेच्या दश॔नासाठी येणारा भाविक वर्ग पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या शहरातील आहे. सध्या पुणे, चिंचवड या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना संसग॔जन्य असल्याने मंदिर 
बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी दश॔नास न येता लाईव्ह दश॔नाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
सप्तशृंगी (वणी) येथील विश्वस्तांसोबत आजच बोलणे झाले असल्याचे ही त्यांनी सांगितले. 
या वेळी महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजीबुवा, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे सदस्य नागेश साळुंके, इंद्रजित साळुंके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो आदी उपस्थित होते. 


धार्मिक विधी सुरू राहणार 
तुळजाभवानी माता मंदिरातील सर्व धार्मिक विधी सुरू राहणार आहेत. तसेच महाद्वार परिसरात सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मंदिरातील छबिना कर्मचाऱ्यांमार्फत काढला जाणार आहे. मंगळवारपासून (ता. १७) ज्या भाविकांनी सिंहासन पूजेसाठी नोंदणी केली होती. त्या सर्व रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या पुजा भाविकांना हवे असल्यास नंतर करता येणार आहे. भाविकांचे भ्रमणदूरध्वनी प्रशासनाकडे आहेत, त्यांना आम्ही आजच माहिती देणार असल्याचे श्रीमती कोल्हे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: महाराष्ट्र डेटा सेंटर हबच्या तयारीत! विकास प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर मोठे बदल! आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होणार, तिकिटाचे दरही वाढणार; प्रवाशांच्या खिशाला फटका

Navi Mumbai: पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे अन्..., अपघातग्रस्त कारमधून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

कृष्णाईच्या लेकी मालिकेत स्टार प्रवाहची अभिनेत्री मुख्य भूमिकेत, जाणून घ्या संपूर्ण कास्ट आणि प्रसारणाची वेळ

Army Cheeta Helicopter Crashes: लडाखमध्ये मृत्यूला हरवून तीन अधिकारी बचावले! भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले

SCROLL FOR NEXT